News Update
Home > Politics > 'वर्धा शहरातील गटार योजनेसाठी फोडलेले रस्ते ताताडीने दुरूस्त करा' - आप

'वर्धा शहरातील गटार योजनेसाठी फोडलेले रस्ते ताताडीने दुरूस्त करा' - आप

वर्धा शहरातील गटार योजनेसाठी फोडलेले रस्ते ताताडीने दुरूस्त करा - आप
X

वर्धा : वर्धा शहरातील गटार योजनेसाठी फोडलेले रस्ते ताताडीने दुरूस्त करा अन्यथा आम आदमी पार्टीच्यावतीने जोरदार आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान याबाबत आधी चर्चा करण्यात आली त्यानंतर निवेदन देण्यात आले. वर्ध शहरातील गटार योजनेसाठी शहरातील रस्ते फोडण्यात आले आहे त्यामुळे अनेक जीवघेणे अपघात होत असून, अनेकांना मणक्याचे आजार झाले असल्याचे आम आदमी पार्टीने म्हटले आहे. सोबतच या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबत जल प्राधिकरण येथील प्रोजेक्ट मॅनेजर यांना घेऊन रस्त्याच्या कामाची दयनीय अवस्था प्रत्यक्षात दाखविण्यात आली.

गटार योजना सुरु करताना रस्ते कटर ने फोडायला पाहिजे होते. परंतू ते झाले नाही. हे रस्ते जेसीबीच्या सहाय्याने फोडण्यात आले याकडे आपने लक्ष वेधले आहे. त्यामूळे रस्त्याला मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. दरम्यान हे खड्डे तातडीने भरले नाही तर आम आदमी पार्टीच्यावतीने जोरदार आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Updated : 15 Sep 2021 5:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top