Home > Politics > बीजेपी के गुंडे कान खोलकर सुन लें... प्रियंका गांधी भाजपवर भडकल्या

बीजेपी के गुंडे कान खोलकर सुन लें... प्रियंका गांधी भाजपवर भडकल्या

बीजेपी के गुंडे कान खोलकर सुन लें... प्रियंका गांधी भाजपवर भडकल्या
X

प्रियंका गांधी सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पंचायत समिती निवडणूकीत भाजप नेत्यांनी हल्ला केलेल्या समाजवादी पक्षाच्या महिलांची भेट घेतली. आणि त्यांना दिलासा दिला. यावेळी प्रियंका यांनी भाजपला चांगलंच सुनावलं...

उत्तर प्रदेशच्या पंचायत समितीच्या निवडणुकीत झालेल्या हिंसाचारात अनेक लोक जखमी झाले. या हिंसाचारात भाजप नेत्यांनी कायदा धाब्यावर बसवत शस्त्राचा वापर करुन लोकांना धमकावल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.

या निवडणुकीत समाजवादी पार्टी च्या अनीता यादव यांचा एक व्हिडियो समोर आला होता. या व्हिडीओत साडी पकडून महिलेला ओढले जात होते. त्यानंतर समाजवादी पार्टीच्या रितू सिंह यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखल्याचा समोर आला होता.

त्यानंतर या प्रकरणात 6 पोलिसांनी निलंबीत करण्यात आलं होतं. आणि एका व्यक्तीला अटक करण्यात आलीआहे. दरम्यान या भेटीनंतर प्रियंका गांधींचा व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये लोकशाही पायदळी तुडवणाऱ्या लोकांना चांगलंच सुनावत आहेत. बीजेपी के गुंडे कान खोलकर सुन लें...

Updated : 17 July 2021 1:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top