Home > Politics > पंतप्रधान नेहमीच आपल्या भाषणातून खोटी आश्वासने देतात – कन्हैया कुमार

पंतप्रधान नेहमीच आपल्या भाषणातून खोटी आश्वासने देतात – कन्हैया कुमार

भारत जोडो यात्रा लोकांसाठी का महत्वाची आहे. या विषयावर कन्हैया कुमार यांनी पत्रकार परिषेद घेऊन महत्ताचे मुद्दे मांडले आहेत. या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात नेमकं काय होणार याची माहिती दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबदद्ल कन्हैया कुमार काय म्हणाले आहेत. पाहुयात पत्रकार परिषेदेतून

पंतप्रधान नेहमीच आपल्या भाषणातून खोटी आश्वासने देतात – कन्हैया कुमार
X

भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर कन्हैया कुमार यांनी पत्रकार परिषेद घेऊन काहि महत्त्वाच्या विषयांवर मुद्दे मांडले, हि यात्रा लोकांसाठी का महत्वाची असून भारत जोडो यात्रेचा दुसऱ्या टप्प्यात काय होणार या विषयावर त्यांनी आपली मते मांडली आहेत.

"कन्हैया कुमार यांना भारत जोडो यात्रेत दोन प्रकारची माणसे पाहायला मिळाली जे आधीच काँग्रेस पार्टीशी जोडले गेले होते. तर दुसरी लोक यात्रा कशी आहे हे अनुभवायला आले होते. या यात्रेला सुरवात होण्यापूर्वी काही ठिकाणी ऊन जास्त लागेल अशी चर्चा होती. परंतू त्या ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस पडला" असा अनुभव कन्हैया कुमार यांनी सागिंतला

कन्हैया कुमार पुढे म्हणातात "या यात्रेला पत्रकारांनी जेवढे दाखवायला पाहिजे होते तेवढे दाखवले नाहि. या यात्रेत चालताना आम्हाला अनुभव आला. जरी भारत जोडो यात्रेला दाखवता आले नाहि तरी लोकांना माहिती असायच कि यात्रा कुठे पोहचली आहे.ज्या महिला यात्रेत सहभागी झाल्या त्या महिला सांगत होते कि सिलेंटर चारशे रुपयांचा हजार रुपये पर्यंत गेला आहे. घर खर्च चालवणे अवघड झाले आहे.

जे तरुण वर्ग यात्रेत सहभागी झाले, त्यांच्या नोकऱ्यांचा प्रश्न होता. ऊसाची शेती करणाऱ्या शतकऱ्यांना देखील समस्या आहेत. त्यांनी देखील त्यांची समस्या सांगितली.या यात्रेचा दुसरा टप्पा देखील होईल. सध्या जे सरकार आहे त्या सरकारला लोकांचे जे मुद्दे आहेत त्यांची उत्तरे देयाला भाग पाडू. त्यासाठी आम्हो प्रयत्न करु"

कन्हैया कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील भाष्य केले. "पंतप्रधान नेहमीच आपल्या भाषेणातून खोटी आश्वासन देत असतात तशी आश्वासने आम्ही देत नाहि. पंतप्रधान मंत्री हे दोनदा निवडूण आले आहेत. आपला देश महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या पीकाला दर मिळत नाहि, महिलांच्य सुरक्षितेचा प्रश्न, त्यामुळे संपूर्ण देश अस्वस्थ आहे. गुजरात मध्ये देखील हेच मुद्दे पाहायला मिळत आहेत.

भ्रष्टाचारी लोक काँग्रेसमध्ये आहेत ते भाजप मध्ये जाऊन स्वच्छ होतात. पंतप्रधान भ्रष्टाचारी लोकांवर खुप बोलतात. परंतू हेच लोक भाजप मध्ये येतात तेव्हा पंतप्रधान काहिच बोलत नाहि." असे महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले


Updated : 13 Nov 2022 8:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top