Home > Politics > देशात 8 राज्याचे राज्यपाल बदलले, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारीचं काय?

देशात 8 राज्याचे राज्यपाल बदलले, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारीचं काय?

8 राज्याचे राज्यपाल बदलले, महाराष्ट्राचे काय? President appoints reshuffle governors eight states modi govt What About Maharashtra Governor Bhagat singh Koshyari

देशात 8 राज्याचे राज्यपाल बदलले, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारीचं काय?
X

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारापुर्वी 8 राज्याचे राज्यपाल बदलले आहेत. (Union Cabinet expansion) महाराष्ट्रात अनेक वेळा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राष्ट्रपतींनी परत बोलावावे अशी मागणी केली जात असताना देशातील 8 राज्यातील राज्यपाल बदलण्यात आले आहेत. (Maharashtra Governor Bhagat singh Koshyari) त्यामुळं महाराष्ट्राचे राज्यपाल बदलण्यात येणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.

दरम्यान केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार जाहीर (cabinet reshuffle) करण्यापूर्वी मंगळवारी आठ राज्यांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद (president ramnath kovind Appoint 8 state Governor) यांनी नवीन राज्यपालांची नेमणूक केली आहे.

राज्यसभा सदस्य आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत (Thawar Chand Gehlot यांची कर्नाटकचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गुजरातचे भाजपा नेते मंगूभाई छगनभाई पटेल यांची मध्य प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मिझोरमचे राज्यपाल पी. एस. पिल्लई यांची बदली झाली असून त्यांची गोवा राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रपतींच्या जनसंपर्क सचिवांच्या हवाल्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली.

राष्ट्रपती भवनातून जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, यातील सर्वात मोठा बदल म्हणजे राज्यसभेचे सदस्य आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांची कर्नाटकचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

73 वर्षीय गेहलोत हे कर्नाटकचे राज्यपाल म्हणून वजुभाई वाला यांच्या जागी येतील. वजुभाई वाला सप्टेंबर 2014 पासून या दक्षिण भारतीय राज्याचे राज्यपाल आहेत.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, राज्यपाल म्हणून गेहलोत यांच्या नियुक्तीमुळे केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्यसभा आणि भाजप संसदीय मंडळासह पक्षाची तीन महत्त्वाची पदं रिक्त झाली आहेत.

गेहलोत हे राज्यसभेत भाजपचे गटनेते होते. त्यामुळं केंद्र सरकारला गेहलोत यांच्या जागेवर 1 जुलैपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापुर्वी एका राज्यसभा खासदाराची निवड करावी लागणार आहे. 2019 ते पासून ते राज्यसभेचे गटनेते होते.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी गुजरातचे भाजप नेते मंगूभाई छगनभाई पटेल यांची मध्य प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या मध्य प्रदेशच्या राज्यपालांचा अतिरिक्त कार्यभार उत्तर प्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे आहे. सहा वेळा आमदार असलेले पटेल म्हणाले की, मध्य प्रदेशचे राज्यपाल म्हणून आपली नवीन जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करू.

त्याच वेळी गोवा भाजपा नेते आणि विधानसभेचे माजी सभापती राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मिझोरमचे राज्यपाल म्हणून आंध्र प्रदेशातील भाजप नेते डॉ. हरी बाबू कंभपती यांच्या नियुक्तीला राष्ट्रपतींनी मान्यता दिली.

मिझोरमचे राज्यपाल पी.एस. पिल्लई यांची बदली झाली असून त्यांना गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूकीपूर्वी गोव्याला पी. श्रीधरन पिल्लई यांच्या रूपाने पूर्णवेळ राज्यपाल मिळाला आहे. सत्यपाल मलिक यांची ऑगस्ट 2020 मध्ये मेघालयात बदली झाल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे गोव्याचा अतिरिक्त कार्यभार होता.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्वीट केले आहे की, गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केल्याबद्दल पी एस श्रीधरन पिल्लई जी यांचे अभिनंदन. आमच्या सुंदर राज्यात त्यांचे स्वागत करण्यास उत्सुक आहे.

त्याचवेळी हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांची त्रिपुरा राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. झारखंडचे राज्यपाल म्हणून त्रिपुराचे राज्यपाल रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांची हरियाणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान सगळ्या घडामोडींमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही.

Updated : 7 July 2021 8:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top