Home > Politics > प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?
X

निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) कॉंग्रेस चा झेंडा हाती घेऊ शकतात. प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यासह राहुल गांधी (Rahul Gandhi) प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांच्या सोबत बैठक घेतली. या बैठकीत प्रशांत किशोर यांनी आगामी 2024 च्या लोकसभा निवडणूकी संदर्भात आणि आगामी 5 राज्याच्या विधानसभा निवडणूकी संदर्भात चर्चा केल्याचं समजतंय.

NDTV ने सुत्राच्या हवाल्याने हे वृत्त दिलं असून या वृत्तात आगामी विधानसभा आणि लोकसभेसंदर्भात मोठं पाऊल उचलण्यात येणार असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. पुढील काळात सर्व निवडणुकांची रणनीति प्रशांत किशोर करणार असल्याचं समजतंय.

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची मंगळवारी भेट घेतली होती. या भेटीनंतर पुन्हा एकदा दिल्लीत राजकीय चर्चेला वेग आला आहे. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही भेट झाली होती.

प्रशांत किशोर यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मोदीविरोधी राष्ट्रीय आघाडीसाठी जुळवाजुळव सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांची भेट महत्त्वाची मानली जाते आहे. पण ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी झाली याची माहिती मिळू शकलेली नाही.

काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीला प्रियंका गांधी, के.सी. वेणू गोपाल आणि पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत उपस्थित होते.

Updated : 14 July 2021 8:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top