Home > Politics > चिंचवड निवडणूकीवरून अजित पवार- प्रकाश आंबेडकर पुन्हा आमने-सामने

चिंचवड निवडणूकीवरून अजित पवार- प्रकाश आंबेडकर पुन्हा आमने-सामने

चिंचवडमधील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पराभवानंतर प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ४४ हजार ८२ मते मिळाल्यामुळे इथे भाजप उमेदवाराचा विजय झाल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. आणि हा विजय आघाडीच्या काही चुकीच्या निर्णयामुळे झाल्याचे आंबेडकर यावेळी म्हणाले.

चिंचवड निवडणूकीवरून अजित पवार- प्रकाश आंबेडकर पुन्हा आमने-सामने
X

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या चिंचवड आणि कसबा पोट निवडणूकीचा निकाल लागला आणि राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. या निकालानंतर अनेक राजकीय प्रतिक्रीया पाहायला मिळाल्या. मात्र वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (PRAKASH AMBEDKAR) यांनी अजित पवार ( AJIT PAWAR ) यांना या निकालावरुन टोला लगावलाय. चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये महायुतीच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि पक्ष उमेदवार राहुल कलाटे ( RAHUL KALATE ) यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली. महाविकास आघाडीतील काट-कलाटे यांच्यामध्ये मतांची विभागणी झाल्यामुळे याचा फायदा भाजपला होवून इथे भाजपच्या अश्विनी जगताप या तब्बल ३६ हजार १६८ मतांधिक्यांनी विजयी झाल्या. मात्र इथे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पराभवाचे खापर आंबेडकर यांनी अजित पवार यांच्या डोक्यावर फोडले.

चिंचवड येथे महाविकास आघाडीने जर राहुल कलाटे (RAHUL KALATE ) यांना उमेदवारी दिली असती तर येथेही महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला असता, असा टोला आंबेडकर यांनी अजित पवार (AJIT PAWAR) यांना लगावला. चिंचवड मतदारसंघात राहुल कलाटे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे कलाटे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. पण अजित पवारांनी नाना काटेंना उमेदवारी देऊ केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनेच राहुल कलाटेंच्या उमेदवारीला विरोध केल्याचा आरोप प्रकाश आंबंडकर यांनी निकालानंतर केला आहे. राहूल कलाटेला (RAHUL KALATE) तुम्ही उमेदवारी द्या आणि निवडूक लढवा ही भूमिका आंबेडकर यांनी घेतली होती. मात्र पवारांच्या हेकेखोरपणामुळे आघाडीला ही जागा गमवावी लागल्याचा आरोप आंबेडकर यांनी अजित पवार (AJIT PAWAR) यांच्यावर लगावला. चिंचवडमधील वंचित आघाडीचे अध्यक्ष आणि तिथल्या सगळ्या टीमने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांना हे आवडले नसल्यामुळे अशी टिका प्रकाश आंबेडकर करत असल्याचा आरोप अजित पवार (AJIT PAWAR) यांनी केला. चिंचवड विधानसभा मतदार संघातील माजी शिवसेना गटनेते राहुल कलाटे (RAHUL KALATE) हे आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांचे दिवंगत वडील तानाजी कलाटे हे जिल्हा परिषद सदस्य आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत (PIMPARI-CHINCHWAD) नगरसेवक होते. पुढे जगताप यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. पण आता चिंचवड येथील आघाडीच्या उमेदवाराचा झालेला पराभव हा सर्वांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे आपापसात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

Updated : 3 March 2023 8:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top