Home > Politics > पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दारुड्या कुटूंबप्रमुखासारखे, प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दारुड्या कुटूंबप्रमुखासारखे, प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दारुड्या कुटूंबप्रमुखासारखे, प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
X

अदानी उद्योग समूहावर हिंडेनबर्ग संस्थेने आरोप केले आहेत. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी अदानींसह पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्र सोडले. यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुटूंबातील दारूड्या कुटूंबप्रमुखासारखे वागत आहेत.

ज्यावेळी दारूडा नवरा कुटूंब चालवतो. त्यावेळी तो घरातील बायकोच्या अंगावरचे सोनं विकतो. मात्र आर्थिक धोरणं बदलण्याऐवजी दारूड्यासारखे घरातील वस्तू विकण्याचा प्रकार पंतप्रधान मोदी यांच्याकडून केला जात आहे.

अदानीसारखा व्यक्ती एखाद्या हॉटेलमध्ये जातो. त्यानंतर त्या हॉटेलच्या रेस्टॉरंटचे बील देतो आणि हॉटेलचे भाडे पुढच्या वेळी देतो असं सांगतो, अशा प्रकारची स्थिती सध्या मार्केटमध्ये सुरु आहे. अदानी एका बँकेकडून कर्ज घेतो आणि ते फेडण्यासाठी दुसऱ्या बँकेकडून कर्ज घेतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून एलआयसीबरोबरच इतर संस्थांचे 45 हजार कोटी पाण्यात जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी खडकवासला येथील जाहीर सभेत बोलताना व्यक्त केले. तसेच नरेंद्र मोदी नंतर पंतप्रधान पदासाठी पुढंचं नाव कोणतं? सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडे सक्षम पर्याय नसल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

Updated : 31 Jan 2023 9:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top