Home > Politics > शकुनीने युतीत महाभारत घडवले आणि स्वतः सत्तेत बसले, पूनम महाजन यांच्या उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

शकुनीने युतीत महाभारत घडवले आणि स्वतः सत्तेत बसले, पूनम महाजन यांच्या उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

शकुनीने युतीत महाभारत घडवले आणि स्वतः सत्तेत बसले, पूनम महाजन यांच्या उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
X

मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आली असताना भाजप नेत्यांनी थेट उध्दव ठाकरे यांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. त्यातच भाजप नेत्या पूनम महाजन यांनी उध्दव ठाकरे यांचा शकुनी असा उल्लेख केला आहे.

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका (Local Body Election) असल्याने भाजपने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यातच मुंबईत भाजपने जागर मेळाव्याला सुरुवात केली आहे. त्यामध्ये भाजप खासदार पुनम महाजन यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्या वांद्रे येथील जागर मेळाव्यात बोलत होत्या.

यावेळी पुनम महाजन म्हणाल्या, मला काहीही म्हणा. पण युतीत महाभारत घडवून शकुनी सत्तेवर जाऊन बसले. विचारांच्या विरोधात, जनमताच्या विरोधात गेले, अशी टीका पुनम महाजन यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर केली.

पुढे बोलताना पुनम महाजन म्हणाल्या की, काही सज्जन लोक माझ्या घरासमोर आणि ऑफिससमोर येऊन पोस्टर्स लावतील. तुझ्या वडिलांना कुणी मारलं विचारतील. पण मला माहिती आहे माझ्या वडिलांना कुणी मारले? त्यांना मारण्यामागे कोण होते? हेसुध्दा मला माहिती आहे, असं वक्तव्य पुनम महाजन यांनी केले.

50-50 चा फॉर्म्युला

जर युतीसाठी 50-50 चा फॉर्म्युला ठरला होता तर मग मुंबई महापालिकेचे महापौरपद अडीच वर्षासाठी भाजपला का दिले नाही? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

Updated : 7 Nov 2022 1:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top