Home > Politics > Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड यांना क्लिन चीट? चित्रा वाघ भडकल्या

Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड यांना क्लिन चीट? चित्रा वाघ भडकल्या

Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड यांना क्लिन चीट? चित्रा वाघ भडकल्या
X

पूजा चव्हाण प्रकरणात आता माजी वनमंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना क्लिन चीट दिल्याच्या बातम्या समोर येत आहेत. (Pooja Chavan Suicide case Pune Police clean cheat to sanjay rathod)

यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार टीका केली असून संजय राठोड यांना क्लिन चीट दिली आहे का? असा सवाल सरकार सह राज्यातील पोलिस यंत्रणेला केला आहे. संजय राठोड यांना क्लिन चीट दिली असेल तर पोलिसांनी या संदर्भात स्पष्टीकरण द्यावं. अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. (Chitra Wagh on sanjay rathod)

दरम्यान पूजा चव्हाण हिच्या आई आणि वडिलांनी या संदर्भात पुणे पोलिसांना आमचा कोणावरही आरोप नाही. असा जवाब दिला असल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात संजय राठोड यांना क्लिन चिट दिली आहे.

यावरुनच चित्रा वाघ भडकल्या असून पूजा चव्हाण प्रकरणात ज्या Audio Clip माध्यमांनी दाखवल्या त्या काय होत्या? त्याचा अर्थ काय? संजय राठोड यांना क्लिन चीट कशी दिली? अशा प्रश्नांची सरबत्तीच चित्रा वाघ यांनी केली आहे.

दरम्यान पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचं नाव आल्यानंतर संजय राठोड यांना वन मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Updated : 16 July 2021 8:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top