Home > Politics > अनिल देशमुख यांच्यावरील ED ची कारवाई राजकीय द्वेषातूनच- सचिन सावंत

अनिल देशमुख यांच्यावरील ED ची कारवाई राजकीय द्वेषातूनच- सचिन सावंत

अनिल देशमुख यांच्यावरील ED ची कारवाई राजकीय द्वेषातूनच- सचिन सावंत
X

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर EDने केलेली कारवाई राजकीय द्वेषातून आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठीच सुरू आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशावरुन राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी कारवाई केली जात असल्याच्या आमच्या आरोपाला ईडीच्या कारवाईने बळ मिळाले आहे, असा दावाही सचिन सावंत यांनी केला आहे. सचिन सावंत यांनी ट्विट करत अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

अनिल देशमुख यांच्यावरील ED ची कारवाई राजकीय द्वेषातूनच- सचिन सावंत1. "अजूनही ₹ 300 कोटींच्या मीडियातील वावड्यांची पुष्टी करता का? कारण आता आपल्या म्हणण्याप्रमाणे ही जमीन २००५ मध्ये खरेदी केली गेली आणि ₹ २.६७ कोटी किंमतीची आहे?

२. फ्लॅटची किंमत २००४ मध्ये दिली गेली तर तो या प्रकरणात कसा जोडला जाऊ शकतो?

३. तुम्ही जाहीर केले की डान्स बारच्या मालकांनी वाझे यांच्यामार्फत @anildeshmukh जी यांना ₹ ४.७० कोटी दिले. ते बार मालक अद्याप गजाआड का नाहीत?

४. तथाकथित ₹१०० कोटींच्या मागणीची माहिती असूनही कोणतीही कारवाई न करणाऱ्या परमबीर सिंग यांची चौकशी का केली जात नाही? यासर्व कारवाया मोदी सरकारच्या आदेशाने आणि महाराष्ट्र विकास आघाडीला बदनाम करण्यासाठी राजकीयदृष्ट्या प्रेरित आहेत या आमच्या म्हणण्याला यातून बळ मिळत आहे."

EDने शुक्रवारी अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे असलेली 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये अनिल देशमुख यांचा वरळीमध्ये असलेला 1 कोटी 54 लाखांचा फ्लॅट आणि उरणमधील धुतम गावात खरेदी केलेला 2 कोटी 67 लाखांचा भूखंड यांचा समावेश आहे.

100 कोटी आणि 300 कोटींचे दावे केले गेलेल्या या प्रकरणात ईडीच्या हाती जास्त काही लागलेले नाही, असे दिसते आहे. त्यामुळे ईडीने अनिल देशमुखांविरुद्ध केलेली कारवाई राजकीय आहे का, असा प्रश्न निर्माण होतो आहे. कारण या आधी अनिल देशमुखांवर 100 कोटी रुपये गोळा केल्याचे, किंवा मुलाच्या नावाने उरणमध्ये 300 कोटींची जागा खरेदी केल्याचे वृत्त ईडीच्या सुत्रांच्या हवाल्याने काही माध्यमांनी दिले होते. त्यामुऴे दावा हजारो कोटींचा आणि ओढून ताणून ४ कोटीची संपत्ती जप्त करण्यात आली, असा प्रकार झाला आहे.

Updated : 17 July 2021 7:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top