Home > Politics > #MVAcrises राजकीय नाट्याचा शेवट? राज्यपाल भेटीसाठी एकनाथ शिंदे मुंबईत

#MVAcrises राजकीय नाट्याचा शेवट? राज्यपाल भेटीसाठी एकनाथ शिंदे मुंबईत

#MVAcrises राजकीय नाट्याचा शेवट? राज्यपाल भेटीसाठी एकनाथ शिंदे मुंबईत
X

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे महा विकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून शिंदे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या गोटांमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. सर्व बंडखोर शिवसेना आमदार आता गुवाहाटीवरुन गोव्यात दाखल झाले आहेत. गोव्याच्या (Goa) ताज हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित करताना याबाबत माहिती दिली.

"मी मुंबईला जात आहे. राज्यपालांची (Governor) भेट घेणार आहे आणि लवकरच पुढचा निर्णय सांगीन. सर्व आमदार गोव्यातच आहेत", असे एकनाथ शिंदे यांनी हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर सांगितले.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांपैकी (Rebel MLA) केवळ एकनाथ शिंदेच गोव्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. शिंदे यांच्यासोबत आमदार रविंद्र चव्हाणही रवाना झाले आहेत. दुपारी १ ते २ वाजताच्या सुमारास एकनाथ शिंदे मुंबईत दाखल होणार असल्याचे म्हटले जात आहे. गोव्याच्या हॉटेलमध्ये शिंदे गटाची बैठक झाली आणि या बैठकीनंतरच एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईत दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती बैठक होईल.

त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी ते राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेणार असल्याचे समजते.

Updated : 30 Jun 2022 7:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top