Home > Politics > मुस्लीम आरक्षण: एमआयएमच्या मुंबईतील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली

मुस्लीम आरक्षण: एमआयएमच्या मुंबईतील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली

मुस्लीम आरक्षण: एमआयएमच्या मुंबईतील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली
X

मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी एमआयएमकडून 'चलो मुंबई'ची घोषणा देण्यात आली आहे. तर यासाठी 27 नोव्हेंबरला यासाठी मुंबईत सभा सुद्धा होणार होती, मात्र मुंबई पोलिसांनी या सभेची परवानगी नाकारली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. तर मुस्लिम समाजातील ५२ जातींचे मागासलेपण ( Muslim Reservation ) उच्च न्यायालयात सिद्ध झाले आहे. असे असताना मुस्लिमांना अद्याप आरक्षण देण्यात आले नाही. हा मुद्दा घेऊन मुसलमान समाज डिसेंबर महिन्यात मुंबईला धडकणार आहे, अशी माहितीही ओवैसी यांनी दिली होती.

तर यासाठी 27 नोव्हेंबरला मुंबईतील एमएमआरडीए मैदानात एमएमआयएमकडून सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कोरोना आणि नांदेड-अमरावतीमध्ये घडलेल्या घटना पाहता या सभेला परवानगी नाकारण्यात आल्याचं पत्र बी. के. सी. पोलिसांनी एमएमआयएमचे नेते फैयाज अहमद खान यांना पाठवलं आहे. तर यावर आपण दुपारी 3 वाजता आपली भूमिका मांडणार असल्याचं जलील यांनी म्हटलं आहे.

Updated : 21 Nov 2021 3:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top