Home > Politics > Hasan Mushrif News : हसन मुश्रीफ यांना धक्का, कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला

Hasan Mushrif News : हसन मुश्रीफ यांना धक्का, कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला

Maharashtra Politics News : संताजी घोरपडे सहकारी साखर कारखान्यातील कथित घोटाळाप्रकरणी हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Hasan Mushrif News : हसन मुश्रीफ यांना धक्का, कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
X

कोल्हापुर (Kolhapur) जिल्ह्यातील कागल येथील संताजी घोरपडे सहकारी कारखान्यात (santaji Ghorpade Sugar factory) 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर ED ने हसन मुश्रीफ यांच्या घरी दोन वेळा धाडी टाकल्या आहेत. त्यानंतर हसन मुश्रीफ यांच्याविरोधात वॉरंट काढण्यात आले. मात्र आता न्यायालयाने हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Hasan mushrif problem increase)

ED ने केलेल्या कारवाईनंतर हसन मुश्रीफ यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. मात्र मुंबई सत्र न्यायालयाने हसन मुश्रीफ यांना ईडीच्या प्रकरणात अटकेपासून दिलासा देण्यास नकार दिला. मात्र हसन मुश्रीफ यांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी कोर्टाने दोन आठवड्यांचा अवधी मागितला होता. मात्र कोर्टाने उच्च न्यायालयात जाण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे 14 एप्रिलपर्यंत हसन मुश्रीफ यांना अटक करण्यात येणार नसल्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टाचे (PMLA Court mumbai) न्यायाधीश एम जी देशपांडे (Justice MG Deshpande) यांनी दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांचे पुत्र नविद, आबिद आणि साजिद यांनी मनी लाँडरिंग केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी हा घोटाळा 1 हजार कोटी रुपयांपेक्षा मोठा असल्याचे म्हटले आहे. त्यावरून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ED ने दोन वेळा धाडी टाकल्या आहेत. त्याबरोबरच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसंदर्भातही चौकशी करण्यात आली. त्याप्रकरणी हसन मुश्रीफ यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्याप्रकरणी हसन मुश्रीफ यांनी मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये किरीट सोमय्या यांनी राजकीय सूडभावनेने हे आरोप केले असल्याचा युक्तीवाद हसन मुश्रीफ यांच्याकडून कोर्टात करण्यात आला. तर ईडीनेही आपली बाजू मांडली. त्यानंतर न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन नाकारला.

Updated : 11 April 2023 2:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top