Home > Politics > PM Modi Mumbai Visit : मोदींच्या दौऱ्यातून मुंबईकरांच्या हाती काय?

PM Modi Mumbai Visit : मोदींच्या दौऱ्यातून मुंबईकरांच्या हाती काय?

मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. मात्र पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्यातून मुंबईकरांच्या पदरी काय पडणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

PM Modi Mumbai Visit : मोदींच्या दौऱ्यातून मुंबईकरांच्या हाती काय?
X

PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी कडेकोट सुरक्षा (PM Modi Security) व्यवस्था करण्यात आली आहे. त्याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या सभेसाठी कंबर कसली आहे. त्यामुळे आगामी काळातील मुंबई महापालिका निवडणूकांच्या (BMC Election) पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौरा महत्वाचा ठरणार आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे या दौऱ्यात मोठे शक्तीप्रदर्शन करण्याचा भाजप (BJP) आणि बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena) पक्षाचा प्रयत्न आहे. तर या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हजारो कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण आणइ प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत कर्जाचे वितरण करणार आहेत.

यामध्ये वरळी, वांद्रे, वर्सोवा, धारावी, मालाड, भांडूप, घाटकोपर (Worli, Bandra, Varsova, Dharavi, Malad, Bhandup, Ghatkopar) या भागात दररोज 2 हजार 464 दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रीया करणाऱ्या 17 हजार कोटींच्या सात प्रकल्पांचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. त्याबरोबरच मुंबई महापालिकेच्या गोरेगाव(Goregaon), भांडुप, ओशिवरा (Oshivara) या भागातील 1 हजार 108 कोटी रुपयांचा खर्च असलेल्या 3 रुग्णालयांचे बांधकाम आणि पुनर्विकास करण्यात येणार आहे. तसेच मुंबईतील (Mumbai Road) 400 किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी 6 हजार 79 कोटी रुपयांच्या कामाचे भुमिपूजन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या (chhatrapati shivaji maharaj terminus redevelopment project) पुनर्विकासासह वारसा वास्तुंचे जतन, पार्किंगसाठी जागा आणि हरित प्रमाणित इमारती करण्यासाठी 1 हजार 813 कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यात करणार आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात दहिसर पूर्व-डीएन नगर दरम्यानच्या मेट्रो मार्ग 2 अ प्रकल्प (Metro Phase 2 A), अंधेरी पूर्व-दहिसर पूर्व मेट्रो 7 (Metro Phase 7) याबरोबरच मुंबई महापालिकेच्या 20 नवीन हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे ( Hinduhrudaysamrat Balasaheb Thackeray Aapala Davakhana) लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधान स्वनिधी योजनेंतर्गत कर्जाचे वितरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान मोदी यांचा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

Updated : 19 Jan 2023 1:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top