Home > Politics > Independent day 2022 : महागाईवर मौन, भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपवण्याचे मोदी यांचे आवाहन

Independent day 2022 : महागाईवर मौन, भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपवण्याचे मोदी यांचे आवाहन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त पंतप्रधान लाल किल्ल्यावरून नेमकं काय बोलणार याकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी महागाईवर मौन बाळगल्याचे दिसून आले.

Independent day 2022 :  महागाईवर मौन, भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपवण्याचे मोदी यांचे आवाहन
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमीत्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातून भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपवण्याचे आवाहन केले आहे.

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, माझी लढाई दोन गोष्टींविरोधात असणार आहे. त्यापैकी एक आहे भ्रष्टाचार आणि दुसरी गोष्ट आणि घराणेशाही.

देशापुढे अनेक संकटं आहेत, मर्यादा आहेत. मात्र या संकटांवर पुढील 25 वर्षात उत्तर शोधलं नाही तर देश अनेक दशकं मागे जाऊ शकतो. त्यापैकी पहिलं संकट आहे भ्रष्टाचार.

एकीकडे लोक गरीबीशी लढत आहेत. त्यांच्याकडे राहण्यासाठी घर नाही. तर दुसरीकडे चोरी केलेला माल ठेवण्यासाठी अनेकांना जागा पुरत नाही. त्यामुळे आमच्या सरकारने लोकांच्या पैशाची होणारी चोरी रोखण्यासाठी आधार आणि मोबाईल यासारख्या आधुनिक व्यवस्थांचा वापर करून दरवर्षी 2 लाख कोटी चुकीच्या हाती जात होते. ते थेट गरज असल्यांच्या हाती पाठवायला सुरूवात केली. त्याबरोबरच बँकांना लुटणाऱ्या अनेक हात रोखले असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. त्यामुळे आगामी काळात भ्रष्टाचाराच्या विरोधात आपल्याला निर्णायक कालखंडाची लढाई आहे. तर यामधून मोठे मोठे लोक वाचणार नाहीत, असा थेट इशारा नरेंद्र मोदी यांनी दिला.

तसंच मोदी पुढे म्हणाले की, भ्रष्टाचार देशाला पोकळ बनवत आहे. मला ही लढाई लढायची आहे. यासाठी तुम्ही मला आशिर्वाद आणि साथ द्या. तरच मी ही लढाई लढू शकतो, असंही मोदी म्हणाले.

पुढे मोदी म्हणाले की, भ्रष्टाचाराचे आरोप सिध्द झाल्यानंतर, न्यायालयाने त्यांना दोषी ठरवल्यानंतरही लोक त्यांचे उदात्तीकरण करतात. तसंच जोपर्यंत भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या विरोधात लोकांच्या मनात राग निर्माण होणार नाही, तोपर्यंत देशात नवी उर्जा निर्माण होणार नसल्याचेही मोदी म्हणाले.

पुढे बोलताना मोदी यांनी देशातील घराणेशाही संपवण्याचे आवाहन केले. यामध्ये नरेंद्र मोदी म्हणाले की, मी घराणेशाहीवर बोललो की राजकारणावर बोललो असं काही लोक म्हणतील. मात्र मी राजकारणातील घराणेशाहीवर नाही तर सर्वच क्षेत्रातील घराणेशाहीवर बोलत आहे.

ही घराणेशाही देशातील अनेक महत्वाच्या संस्था आपल्या ताब्यात घेऊन बसली आहे. त्यामुळे देशाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे देशात भ्रष्टाचार वाढत असल्याची टीकाही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केली.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा क्षेत्रात घराणेशाही निर्माण झाली तर गुणी खेळाडूंना संधी मिळत नाही. त्याठिकाणी राजकारण होऊन क्षमता नसलेले लोक स्पर्धेत जात होते. त्यामुळे 75 वर्षात भारताला पदक मिळत नव्हते. मात्र आता क्रीडा क्षेत्रातील घराणेशाही संपवण्यास सुरूवात केल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक स्पर्धांमध्ये भारताचा राष्ट्रध्वज सन्मानाने फडकत असून राष्ट्रगीत अभिमानाने वाजत आहे. त्यामुळे देशातील सर्वच क्षेत्रातील घराणेशाही संपवण्याचे आवाहन मोदी यांनी केले.

पुढे मोदी म्हणाले की, मी संविधानाचे स्मरण करून तुम्हाला घराणेशाहीच्या विरोधात उभं राहण्याचे आवाहन करतो. तुम्ही घराणेशाहीच्या विरोधात पुढे आलात तरच ही समस्या मिटेल असंही मोदी यावेळी म्हणाले.

मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण भाषणात महागाईवर अवाक्षरही काञलं नाही.

महापुरूषांचे स्मरण

महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वि. दा.सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यामध्ये तसेच देशाच्या जडघडणीमध्ये मोठे योगदान आहे. आज त्यांचे स्मरण करून आभार मानायचा दिवस आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी या महापुरुषांनी आपले आयुष्य समर्पीत केले. स्वातंत्र्य हाच त्यांचा ध्यास होता. अशा महापुरुषांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा पवित्र दिवस आहे.देशाने गेल्या 75 वर्षांत अनेक संकटांचा सामना केला. मात्र या सर्व संकटांवर मात करत आज भारत पुढे आला आहे,असंही मोदी म्हणालेत.

'आझादी का अमृत महोत्सव' देशभर साजरा होत आहे. हर घर तिरंगा हा उपक्रम केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत देशभरात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सरकारतर्फे 'हर घर तिरंगा' अभियान राबवण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस सर्वांना आपल्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केले आहे.

स्वातंत्र्यानंतर जन्मलेला मी पहिला व्यक्ती लाल किल्यावरून देशाला संबोधित करत आहे.

आज देश स्वातंत्र्याची (Independence Day) पंचाहत्तरी साजरी करत आहे. 'आझादी का अमृत महोत्सव' (Azadi Ka Amtrut Mahotsav) देशभर साजरा होत आहे. हर घर तिरंगा हा उपक्रम केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येत आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आहेत. "स्वातंत्र्यानंतर जन्मलेला मी पहिला व्यक्ती ज्याला लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करण्याची संधी मिळाली आहे, याचा आनंद वाटतोय. शिवाय ही मोठी जबाबदारी असल्याचं मी मानतो", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत.

भारत लोकशाहीची जननी आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. लाल किल्ल्यावरून देशवासीयांचा गौरव करण्याची संधी मिळालेली मी पहिली व्यक्ती आहे. मी देशाचा पंतप्रधान म्हणून बोलतोय. पण मी या देशातील जनतेचं दु:ख: जानतो. मी जितंक तुमच्याकडून शिकलोय तितकंच मी तुम्हाला ओळखतोय. तुमच्या सुख-दु:ख शी मी परिचीत आहे. ते दु:ख दूर करण्यासाठी मी कायम प्रयत्नसील करेन. त्यासाठी मी संपूर्ण वेळ द्यायला तयार आहे. शेवटच्या माणसाला फायदा व्हावा, हे राष्ट्रपिता महात्मा गांधींचं स्वप्न होतं. मी माझे महात्मा गांधींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला समर्पित केलं आहे, असंही मोदी म्हणालेत.

टाळी थाळी वाजवण्याचे केले समर्थन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, कोरोना योध्यांचं कौतूक करण्यासाठी आपण टाळ्या- थाळ्या वाजवल्या. त्यावेळी देशाच्या एकतेचं दर्शन घडलं. कोरोना विरोधात एकाच वेळी आपण सगळे एक आहोत हे दिसावं यासाठी मेणबत्त्या लावल्याने एकतेचं दर्शन घडलं असं मत व्यक्त करीत नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात टाळी-थाळी आणि दिवे लावण्याच्या आवाहनाचे समर्थन केले.

मोदी यांनी सांगितली पंचसूत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचसूत्री सांगितली.

१) आता देश मोठे संकल्प घेऊनच चालणार असल्याचे सांगत विकसीत भारत हे सूत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. यामध्ये पंतप्रधान म्हणाले की, देशात गुलामीचा एक अंशही राहणार नाही, याविषयी आता देशवासियांनी संकल्प केला पाहिजे. गुलामीचा अंश कोणत्याही परिस्थितीत संपवला पाहिजे. शत प्रतिशत शेकडो वर्षांच्या गुलामीने आपल्याला बांधून ठेवले आहे. त्यात काही लोकांच्या मनात विकृती आहे. त्यामुळे अशी गुलामी कुठं दिसत असेल तर त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

२) आम्हाला आमच्या व्यवस्थेवर गर्व असायला हवा

यामध्ये नरेंद्र मोदी म्हणाले की, यामध्ये आपल्या देशातील प्रत्येक भाषेवर, आपल्या परंपरांवर आपल्या देशातील विविधतेवर आपल्याला गर्व असायला हवा, असं पंतप्रधान म्हणाले.

कौशल्यावर भर

३) एकता आणि एकजूटता

देशाला उंचीवर नेण्यासाठी एकता आणि एकजूटतेची ताकद महत्वाची आहे. लैंगिक समता, समाजातील उच-नीचता यातील भेद मिटवून एकता निर्माण केली पाहिजे. श्रमिकांचा सन्मान हा आपला स्वभाव असावा असं मोदी म्हणाले. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आमच्यात विकृती आली आहे. ज्यामध्ये आम्ही महिलांचा अपमान करतो. स्वभावामुळे, संस्कारामुळे, दररोजच्या जीवनात महिलांचा अपमान करणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून मुक्तीचा संकल्प करू शकतो. महिलांचा सन्मान स्वप्न पुर्ण करण्यातली मोठं भांडवल असणार आहे, असं मोदी म्हणाले.

४) नागरिकांचे कर्तव्य

जगात ज्या देशांनी प्रगती केली आहे. त्या देशात एक अनुशासित जीवन, कर्तव्यासाठी समर्पण करण्याची आवश्यकता आहे. तसंच वीज पोहचवणे शासनाचे कर्तव्य आहे. पण ती वाचवणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. प्रत्येक शेतात पाणी पोहचवणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र ते पाणी जपून वापरणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे.

रसायन मुक्त शेती संकल्प करून प्राकृतिक शेती करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

कौशल्यावर भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांनी कौशल्यावर भर देण्याचे आवाहन केले.

Updated : 15 Aug 2022 6:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top