Home > Politics > 'ती' बातमी खोटी: पंकजा मुंडे

'ती' बातमी खोटी: पंकजा मुंडे

'ती' बातमी खोटी: पंकजा मुंडे

ती बातमी खोटी: पंकजा मुंडे
X

आज मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होत आहे. आज संध्याकाळी साडेपाच वाजता राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. हा मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला विस्तार असून मोदी सरकार मधील जवळपास 24 मंत्रीपदाच्या जागा रिक्त आहेत. Union Cabinet expansion

या मंत्रीमंडळ विस्तारात खासदार हिना गावीत, नारायण राणे यांची नावं चर्चेत आहेत. त्यानंतर खासदार प्रितम मुंडे आणि खासदार रक्षा खडसे यांचं नाव देखील चर्चेत होतं. मात्र, आता या नावांवर पडदा पडला आहे.

खासदार प्रितम मुंडे यांना मंत्री पद मिळणार अशी चर्चा सुरु असताना स्वत: पंकजा मुंडे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पाहिली ती चुकीची आणि खोटी आहे. मी प्रीतम ताई आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबई च्या निवासस्थानी आहोत..

अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातून कोण?

नारायण राणे पत्नीसह दिल्लीत दाखल झाले आहेत. तसंच महाराष्ट्रातून खासदार कपिल पाटील, हिना गावीत, भागवत करता यांच्या नावाची चर्चा आहे. तर दुसरीकडे ज्योतिरादित्य शिंदे, सर्वानंद सोनोवाल, पश्चिम बंगालचे शांतनू ठाकूर, लोकजनशक्ती पक्षाचे पशुपती पारस दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळं ही नाव निश्चित समजली जात आहेत.



Updated : 13 Jun 2022 9:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top