Home > Politics > भाजपला धक्का, पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्ष ACBच्या ताब्यात

भाजपला धक्का, पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्ष ACBच्या ताब्यात

भाजपला धक्का, पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्ष ACBच्या ताब्यात
X

पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ताब्यात घेतले आहे. ९ लाख रुपयांच्या लाच प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. लाच प्रकरणात पुणे ACB ने थेट पिंपरी चिंचवडच्या स्थायी समिती अध्यक्षांनाच ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. पिंपरी महानगरपालिकेत टेंडर पास करण्यासाठी नऊ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे यांना दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले. यानंतर लांडगे यांचीही चौकशी करण्यात आली आणि त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

बुधवारी पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्व साधारण सभा सुरू होती. ही सभा सुरू असतानाच ACBने धाड टाकली होती. स्थायी समिती सभापतींच्या कार्यालयाचे प्रमुख आणि इतर कर्मचा-यांना ताब्यात घेण्यात आले आणि ACBच्या अधिकाऱ्यांनी लांडगे यांची चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना सोबत नेण्यात आले आहे. यावेळी माध्यमांनी आपल्याला गोवण्यात आले आहे असे वाटते का असा सवाल नितीन लांडगे यांना विचारला, पण नितीन लांडगे यांनी यावेळी कोणतेही उत्तर दिले नाही. तसेच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू असल्याचे सांगत नितन लांडगे यांना गाडीत बसवून नेले. एसीबीच्या या कारवाईमुळे सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे. या कारवाईच्या वेळी महापालिकेत पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी या कारवाईसंदर्भात विचारले तेव्हा याबद्दल माहिती घेऊन प्रतिक्रिया देऊ असे सांगितले.

Updated : 18 Aug 2021 2:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top