Home > Politics > संसदेचे पावसाळी अधिवेशन, सरकारला घेरण्यासाठी विरोधक सज्ज

संसदेचे पावसाळी अधिवेशन, सरकारला घेरण्यासाठी विरोधक सज्ज

संसदेचे पावसाळी अधिवेशन, सरकारला घेरण्यासाठी विरोधक सज्ज
X

संसदेच्या पावसाळी अधिवेशऩाला आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात मोदी सरकारची कसोटी लागणार आहे. कोरोना संकटाची हाताळणी, लसीकरण कार्यक्रमातील गोंधळ, इंधन दरवाढ, वाढती महागाई, शेतकऱ्यांचे आंदोलन या मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. 13 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात 29 विधेयके आणि दोन आर्थिक प्रस्ताव मंजुरीसाठी मांडले जाणार आहेत. तसेच 6 अध्यादेशांसाठी विधेयकही सादर केली जाणार आहेत. लोकसभेचे कामकाज 11 ते 1 आणि दुपारी 2 ते संध्याकाळी 6 असे चालणार आहे. लोकसभा अध्यक्षांनी या अधिवेशनात मंत्र्यांना प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी काही ठराविक कालावधी ठरवून दिला आहे. रोटेशन पद्धतीने मंत्र्यांना उत्तरे देता येणार आहेत.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक झाली. पावसाळी अधिवेशना दरम्यान संसदेचं कामकाज सुरळीतपणे चालावं. या उद्देशाने ही बैठक बोलावली होती. सर्व पक्षांचं विविध मुद्द्यांवर मत जाणून घेऊन संसदेचं कामकाज सुरुळीत पणे चालण्यासाठी ही बैठक महत्त्वाची होती. ही बैठक सुमारे पावणे तीन तास चालली. मात्र, ही बैठक ज्या कारणांसाठी बोलावली होती. ते ऐकून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीच या बैठकीला नव्हते. मोदी शेवटचे आठ मिनिटं या बैठकीला हजर होते.

त्यामुळं विरोधी पक्षांनी ही बैठक फक्त औपचारिकता म्हणून बोलावली होती का? असा उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्व पक्षीय नेत्यांचं मत जाणून घ्यायला वेळ नाही का? असा सवालही काही पत्रकारांनी उपस्थित केला आहे. महागाई, कोरोना विरुद्धच्या लढ्यात आलेलं अपयश, लसीकरण, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती, परराष्ट्र धोरण, शेतकरी आंदोलन, राफेल यासारख्या मुद्द्यांवर विरोधक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.

Updated : 19 July 2021 2:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top