Home > Politics > Video: भर पावसात संसदेच्या बाहेर मोदींची मन की बात... म्हणाले

Video: भर पावसात संसदेच्या बाहेर मोदींची मन की बात... म्हणाले

Video:  भर पावसात संसदेच्या बाहेर मोदींची मन की बात... म्हणाले
X

आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: छत्री घेऊन संसदेत पोहोचले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मात्र, हा संवाद मोदी यांच्या 'मन की बात' ठरला. कारण या संवादात एकाही पत्रकाराना प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली नव्हती. Parliament Monsoon Session

पंतप्रधान म्हणाले की, या साथीने संपूर्ण जगाला वेढले आहे, त्यामुळे संसदेतही या साथीच्या संदर्भात अर्थपूर्ण चर्चा व्हायला हवी असं आम्हाला वाटतं. सर्व व्यावहारिक सूचना सर्व खासदारांनी करायला हव्यात.

मी आशा करतो की तुम्हा सर्वांना लसीचा किमान एक डोस तरी मिळाला असेल. लस दंडांवर (बाहू) दिली जाते त्यामुळे लस घेतल्यावर तुम्ही बाहुबली बनता. कोरोनाविरूद्धच्या लढाईमध्ये आत्तापर्यंत ४० कोटीहून अधिक लोक बाहुबली बनले आहेत.

पंतप्रधान म्हणतात की, संसदेचं पावसाळी अधिवेशन अर्थपूर्ण चर्चेसाठी समर्पित असले पाहिजे. कारण लोकांना बर्‍याच विषयांवर उत्तरं हवी आहेत. आणि सरकार यासाठी पूर्णपणे तयार आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पत्रकारांशी बोलताना पंतप्रधानांनी विरोधी पक्षाने कठीण प्रश्न विचारावे. परंतु शांत वातावरणात सरकारला उत्तर देण्याची संधी सुद्धा द्यावी असं आवाहन देखील यावेळी मोदी यांनी केलं आहे.

Updated : 19 July 2021 6:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top