Home > Politics > Parliament Monsoon Session: सर्व पक्षीय बैठकीला सुरुवात, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित

Parliament Monsoon Session: सर्व पक्षीय बैठकीला सुरुवात, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित

Parliament Monsoon Session: सर्व पक्षीय बैठकीला सुरुवात, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित Parliament Monsoon Session Govt convenes all party meeting ahead of Monsoon session of Parliament Pm Modi present

Parliament Monsoon Session: सर्व पक्षीय बैठकीला सुरुवात, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित
X

संसदेचं पावसाळी अधिवेशन (Parliament Monsoon Session) 19 जुलै ला सुरु होत आहे. या अधिवेशनापुर्वीच आज भाजपने सर्वदलीय बैठक बोलावण्यात आली आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी देखील (PM Narendra Modi) या बैठकीत सहभागी झाले आहेत. या बैठकीत संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरुळीतपणे चालावं यासाठी सरकार विरोधी पक्षांची मदत मागणार आहे.

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. सरकार या अधिवेशनात साधारणपणे 30 विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. त्या पैकी 17 विधेयकं नवीन आहेत.

विरोधक कोणत्या मुद्द्यावर आक्रमक होतील?

महागाई, कोरोना विरुद्धच्या लढ्यात आलेलं अपयश, लसीकरण, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती, परराष्ट्र धोरण, शेतकरी आंदोलन, राफेल यासारख्या मुद्द्यांवर विरोधक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.

बैठकीला कोण आहे उपस्थित?

राजनाथ सिंह, पीयूष गोयल, प्रल्हाद जोशी, मल्लिकार्जुन खड़गे, अधीर रंजन चौधरी, आनंद शर्मा, संजय राउत, पशुपति पारस, अनुप्रिया पटेल, रामगोपाल यादव, त्रुची शिवा, टीआर बालू, हरसिमरत कौर बादल, डेरेक ओ ब्रायन, सुदीप बंधोपाध्याय, संजय सिंह हे नेते उपस्थित आहेत.

Updated : 18 July 2021 9:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top