Home > Politics > Parliament Monsoon Session: सरकारने बोलावली सर्व पक्षीय बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार

Parliament Monsoon Session: सरकारने बोलावली सर्व पक्षीय बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार

Parliament Monsoon Session: सरकारने बोलावली सर्व पक्षीय बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार
X

संसदेचं पावसाळी अधिवेशन (Parliament Monsoon Session) 19 जुलै ला सुरु होत आहे. या अधिवेशनापुर्वीच सर्वदलीय बैठक बोलावण्यात आली आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी देखील (PM Narendra Modi) या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरुळीतपणे चालावं यासाठी सरकार विरोधी पक्षांची मदत मागेलं

केंद्रीय संसदीय कामकाड मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. सरकार या अधिवेशनात साधारणपणे 30 विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. त्या पैकी 17 विधेयकं नवीन आहेत.

विरोधक कोणत्या मुद्द्यावर आक्रमक होतील?

महागाई, कोरोना विरुद्धच्या लढ्यात आलेलं अपयश, लसीकरण, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती, परराष्ट्र धोरण, शेतकरी आंदोलन, राफेल यासारख्या मुद्द्यांवर विरोधक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.

Updated : 14 July 2021 7:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top