Home > Politics > विधान परिषद निवडणूक: आय्यारामांना संधी, पंकजा मुंडेंना पुन्हा डावललं...!

विधान परिषद निवडणूक: आय्यारामांना संधी, पंकजा मुंडेंना पुन्हा डावललं...!

विधानपरिषद निवडणूक: पंकजा मुंडे यांना डावलल्यानंतर पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या हात पसरवणारं नाही...

विधान परिषद निवडणूक: आय्यारामांना संधी, पंकजा मुंडेंना पुन्हा डावललं...!
X

बुलडाणा : एखाद्या गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेऊन नतमस्तक होईल. मात्र, कुठल्या पदासाठी हाथ फैलावून मागणी करण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत, असे रोखठोक वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले. त्या बुलडाण्यात बोलत होत्या. या वक्तव्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपली खदखद पुन्हा एकदा जाहीरपणे बोलून दाखवल्याचं बोललं जात आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील दुसरं बीड येथे माजी आमदार तोताराम कायंदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृत महोत्सव कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. पदासाठी कुणासमोर हात फैलावण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत असं म्हणत त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधला. "माझं विश्व, माझे माता-पिता, माझं सर्वस्व जनता आहे. तुम्हाला दहा परिक्रमा करेल अजून कुठल्या प्ररिक्रमाची मला आवश्यकता नाही. एखाद्या गरीब फाटक्या माणसाला त्याच्या पायावर डोकं ठेऊन नतमस्तक होईल. पण कुठल्या पदासाठी हाथ फैलावून मागणी करण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत," असं थेट वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं.

पंकजा मुंडे आपल्या रोखठोक वक्तव्यांने नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी यापूर्वीदेखील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलेलं आहे. मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात डॉ. प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने मुंडे भगिनींची ही खदखद प्रकर्षाने समोर आली होती. त्यावेळी राज्यात मोठं अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं होतं. राज्यभरातून मुंडे भगिनी समर्थकांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर पंकजा यांनी दिल्लीला वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. दिल्लीतील नेत्यांशी चर्चा झाल्यानंतरच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला होता.

दरम्यान, यावेळीसुद्धा पंकजा यांनी कोणासमोर हात फैलावण्याचे संस्कार आमच्यात नाहीत, असं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यानंतर आता भाजपच्या इतर नेत्यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Updated : 21 Nov 2021 4:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top