News Update
Home > Politics > पंकजा मुंडे यांच्या मनात काय, 14 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

पंकजा मुंडे यांच्या मनात काय, 14 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

पंकजा मुंडे यांच्या मनात काय, 14 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
X

गेल्या काही दिवसांपासून मोदी मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा होती. अखेर हा मंत्रीमंडळ सोहळा Modi Cabinet expansion नुकताच पार पडला. या मंत्रीमंडळ विस्तारात ४३ नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. दरम्यान या ४३ मंत्र्यांच्यासह मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या आता ७८ झाली आहे. मात्र, या ७८ मंत्र्यांच्या या यादीत खासदार प्रितम मुंडे यांना संधी न दिल्यानं आता मुंडे समर्थकांनी राजीनामा सत्र हातात घेतलं आहे.

राज्यात मुंडे परिवाराला डावललं जात असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं नाराज झालेल्या मुंडे समर्थकांनी राजीनामा द्यायला सुरुवात केली आहे. बीड भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा दिल्यानंतर, आज जिल्ह्यातील जवळपास 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

आज शिरूर कासार तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, सविता रामदास बडे यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाचा तर प्रकाश खेडकर यांनी पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. यासह जिल्ह्यातील भाजपच्या विविध 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. दरम्यान प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने , बीड जिल्ह्यातील भाजप गटात मोठी नाराजी आणि अस्वस्थता पसरली आहे.

दोन दिवसात तब्बल चौदा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असल्याने, आता आणखन किती राजीनामे येणार? आणि आता पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेणार? यासह या राजीनामा सत्रामुळे पंकजा मुंडे यांच्या मनात नक्की काय सुरु आहे? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Updated : 10 July 2021 12:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top