Home > Politics > बीड मधील मुंडे समर्थकांची नाराजी चव्हाट्यावर... थेट भाजप पक्षश्रेष्ठीवर गंभीर आरोप...

बीड मधील मुंडे समर्थकांची नाराजी चव्हाट्यावर... थेट भाजप पक्षश्रेष्ठीवर गंभीर आरोप...

झाले ते अति झाले, देवेंद्र फडणवीसांनी असं करू नये, अन्यथा मराठवाड्यातील कमळ बी देखील उरणार नाही. पंकजा मुंडे समर्थकांची नाराजी भाजपची डोकेदुखी ठरली असून भाजप समोर पंकजा मुंडे समर्थकांना शांत करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे, प्रतिनिधी हरिदास तावरेंचा रिपोर्ट...

बीड मधील मुंडे समर्थकांची नाराजी चव्हाट्यावर... थेट भाजप पक्षश्रेष्ठीवर गंभीर आरोप...
X

पंकजा मुंडे यांना विधान परिषदेचे तिकीट नाकारल्यानंतर, बीडमधील भाजपा कार्यकर्ते आणि पंकजा मुंडे समर्थक यांनी थेट भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत तीव्र नाराजी व्यक्त केलीय. पंकजा मुंडे भावी मुख्यमंत्री होतील या भीतीपोटी आणि इर्षेपोटी 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा ताईंना पाडण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला. धनंजय मुंडे यांना मदत केली असा गंभीर आरोप केल्याने बीड भाजपामधील पक्ष पातळीवरील खदखद समोर आलीय..एकीकडे राज्यसभेच्या विजयोत्सव साजरा करणाऱ्या भाजप समोर पंकजा मुंडे समर्थकांना शांत करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे..

विधान परिषदमध्ये पंकजा मुंडे यांचा पत्ता कट केल्यानंतर भाजप पक्षश्रेष्ठी व देवेंद्र फडणीस यांना सद्बुद्धी मिळावी, याकरिता त्यांनी चक्क हनुमान मंदिराच्या समोर हनुमान चालीसाच पठण करत साकडे घातले होते. यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली. विधान परिषदेच्या यादीत पंकजा मुंडेचे नाव न आल्याने राज्यभर पंकजा मुंडे समर्थक यांनी उघड नाराजी व्यक्त केली.. मात्र गेली दोन दिवस बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडे समर्थक मात्र शांत होते.आज त्यांच्यामधील खदखद बाहेर आलीय.नेत्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून कंकालेश्वर मंदिरात दुग्धाभिषेक केला तर आज हनुमान चालीसा पठण केलीय.विविध मार्गातून कार्यकर्ते आपली नाराजी जाहीर करत आहेत.संताप देखील व्यक्त करत आहेत, यावेळी त्यांनी थेट पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना इशारा दिला आहे.

ऊसतोड मजूर, शेतकरी, बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातीच्या लोकांमध्ये कालच्या यादीमध्ये त्याला विधानपरिषद उमेदवारीपासून डावल्यामुळे लोक संतापलेली आहेत.असचं चालत राहीलं तर सर्वसामान्य माणूस रस्त्यावर येईल आणि याचा खूप मोठा उद्रेक होईल.. बीड जिल्हा मराठवाडा नाहीतर राज्यातील सर्वच मतदारसंघात भाजपाला याचा परिणाम भोगावे लागेल, असा इशारा भाजपचे माजी पंचायत समिती सभापती विष्णू घुले यांनी दिलाय..

पंकजा मुंडे भावी मुख्यमंत्री होतील या भीतीपोटी आणि इर्षेपोटी, 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा ताईंना पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केला. त्यांनी धनंजय मुंडे यांना मदत केली. असा आरोप भाजप भटक्या-विमुक्त आघाडीचे तालुकाध्यक्ष संभाजी गायकवाड यांनी केला.. पंकजा मुंडे यांना डावलून भाजपला पंचायत समिती सदस्य देखील निवडून आणता येणार नाही. असं संभाजी गायकवाड म्हणाले.

पक्षामध्ये गटबाजी करून भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असलेला मराठवाडा फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपने पंकजा मुंडे यांना ताकद दिली तरचं मराठवाड्यामध्ये भाजप टिकू शकेल अन्यथा नाही. गटबाजी करून पंकजा मुंडे यांना डावलून लोकनेता होण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर ते कदापि शक्य होणार नाही. त्यांचं ते स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही.असा इशारा भाजपा तालुका अध्यक्ष भगवान केदार यांनी दिला

पंकजाताईवर वारंवार अन्याय केला जात आहे, हे सहन केलं जाणार नाही. त्यांचं खच्चीकरण केले जाते आहे. यासंदर्भात सर्व समाजातील घटकांमध्ये तीव्र नाराजी असून त्याचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी हे थांबवावं, अशी मागणी वासुदेव नेहरकर यांनी केली.

प्रत्येक वेळेस पंकजा मुंडे यांना डावलण्याचा प्रयत्न केला जात असेल तर याचा खूप मोठा परिणाम आणि तोटा भाजपला सहन करावा लागेल. पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांची ताकद खूप मोठी आहे.आज सर्वसामान्य लोकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे, असं दत्ता धस म्हणाले.

पंकजा मुंडे यांना वारंवार डावलन्यामध्ये देवेंद्र फडवणीस यांचा हात आहे. मुंडे साहेबांच्या लेकीला टाळणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे आहे, हे देवेंद्र फडणीस यांना कळलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा सत्तेत यायचे असेल, तर त्यांनी पंकजा मुंडे सोबत जुळवून घेणे गरजेचे आहे, नाहीतर याचा उद्या काय होईल, ते सांगता येणार नाही. तळागाळातील लोकांमध्ये भाजप पक्षासंदर्भात तीव्र संताप निर्माण झाला असून त्याचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही.

जर हे काम थांबवले नाही, तर भारतीय जनता पार्टीचे रोपटे मराठवाड्यातच दिसणार नाही. देवेंद्र फडणीस यांनी बीडमध्ये येण्याची हिम्मत करू नये, आलेच तर समाजाचा उद्रेक आहे. लोक काय करतील सांगता येत नाही. असा धमकीवजा सज्जड दम देखील, पंकजा मुंडे कार्यकर्ता संभाजी गायकवाडनं दिलायं.

भाजप पक्षवाढीसाठी गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे योगदान खूप मोठे आहे. मात्र तरी देखील पक्षश्रेष्ठी त्यांना डावलत आहे, हे भारतीय जनता पार्टीला महागात पडणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्याचे परिणाम दिसून येतील असं संभाजी कांबळे म्हणाले.

दरम्यान विधान परिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्याची चर्चा रंगली होती. यावरून मोठ्या प्रमाणात आश्वासन देखील दिली, मात्र प्रत्यक्षात पंकजा मुंडे यांचा पत्ता कट केल्याने राज्यातील मुंडे समर्थकांमध्ये नाराजीची लाट आहे. राज्यसभेच्या विजयानंतर भाजपा एकीकडे विजयोत्सव साजरा करत आहे. मात्र दुसरीकडे अंतर्गत गटबाजीचा सामना करताना पंकजा मुंडे यांच्या समर्थकांची नाराजी भाजपाला चांगलीच महागात पडणार असल्याचं चित्र निर्माण झालंय.. यासंदर्भात भाजप पदाधिकाऱ्याकडून उघड-उघड नाराजी व्यक्त केली जात आहे. ही नाराजी कोणत्या टोकापर्यंत जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बीडमध्ये पुन्हा एकदा प्रवीण दरेकर यांची गाडी आणि ताफा आडण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांकडून पंकजाताई मुंडे यांच्या समर्थका कडुन करण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करत घोषणाबाजी केली होती. त्र यामध्ये ताफा अडवत असताना प्रवीण दरेकर यांच्या चालकाने घडवणाऱ्या कार्यकर्त्यांना चक्क गाडीत खाली शिरण्याचा प्रयत्न केला होता. भाजप कार्यकर्ते पंकजाताई समर्थक हे पुन्हा आक्रमक झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली असून यामध्ये पोलीस प्रशासनाला देखील या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं.

Updated : 12 Jun 2022 2:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top