Home > Politics > पंकजा मुंडे अचानक दिल्लीला रवाना, दिल्लीत वरिष्ठांची भेट घेणार, चर्चेला उधाण

पंकजा मुंडे अचानक दिल्लीला रवाना, दिल्लीत वरिष्ठांची भेट घेणार, चर्चेला उधाण

पंकजा मुंडे अचानक दिल्लीला रवाना, दिल्लीत वरिष्ठांची भेट घेणार, चर्चेला उधाण
X

नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात डॉ. प्रितम मुंडे यांना मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता अधिक होती. विशेष म्हणजे त्याचं नावही चर्चेत होते. मात्र, अचानक डॉ. भगवानराव कराड यांचं नाव आल्यानं मुंडे समर्थकांमध्ये मोठा राग आहे.

मोदी मंत्रीमंडळ विस्तारात ४३ नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. दरम्यान या ४३ मंत्र्यांच्यासह मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या आता ७८ झाली आहे. मात्र, या ७८ मंत्र्यांच्या या यादीत खासदार प्रितम मुंडे यांना संधी न दिल्यानं आता मुंडे समर्थकांनी राजीनामा सत्र हातात घेतलं आहे.

राज्यात मुंडे परिवाराला डावललं जात असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं नाराज झालेल्या मुंडे समर्थकांनी राजीनामा द्यायला सुरुवात केली आहे. बीड भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा दिल्यानंतर, आज बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास 25 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

शिरूर कासार तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, सविता रामदास बडे यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाचा तर प्रकाश खेडकर यांनी पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. यासह जिल्ह्यातील भाजपच्या विविध 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. दरम्यान प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने , बीड जिल्ह्यातील भाजप गटात मोठी नाराजी आणि अस्वस्थता पसरली आहे.

दोन दिवसात तब्बल 25 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असल्याने, आता आणखी किती राजीनामे येणार? आणि आता पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेणार? यासह या राजीनामा सत्रामुळे पंकजा मुंडे यांच्या मनात नक्की काय सुरु आहे? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात असताना पंकजा मुंडे दिल्लीत रवाना झाल्या आहेत.

राज्याच्या राजकारणात मुंडे परिवाराला डावलण्यात येत असल्याचं चित्र निर्माण झाले. त्यामुळे अनेक मुंडे समर्थकांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली होती. पंकजा मुंडे नाराज आहेत. असं बोललं जात असताना पंकजा यांनी पत्रकार परिषद घेत आपण नाराज नसल्याचं सांगितलं होतं. मात्र, आज पंकजा मुंडे दिल्लीला रवाना झाल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

Updated : 11 July 2021 5:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top