Home > Politics > Video: पंकजा मुंडे यांच्या डोळ्यात पाणी...

Video: पंकजा मुंडे यांच्या डोळ्यात पाणी...

प्रितम मुंडे यांना मंत्रीपद नाही, पंकजा मुंडे यांच्या डोळ्यात पाणी... pankaja munde on pritam munde Cabinet Expansion issue pankaja react on Devendra Fadnavis And Narendra Modi decision

Video: पंकजा मुंडे यांच्या डोळ्यात पाणी...
X

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्राच्या वाट्याला 4 मंत्री पद मिळाली. त्यामध्ये नारायण राणे, डॉ. भागवत कराड, डॉ. भारती पवार आणि कपील पाटील यांचा नंबर लागला. या मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर भाजपच्या वतीने या मंत्र्यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात असताना पंकजा मुंडे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात प्रितम मुंडे यांना स्थान दिलं जाण्याची शक्यता होती. तशी चर्चा देखील होती. वंजारी समाजाला केंद्रात गोपिनाथ मुंडे नंतर त्यांची कन्या खासदार प्रितम मुंडे यांना मंत्री पद दिलं जाईल. असं बोललं जात होतं. मात्र, तसं झालं नाही. प्रितम मुंडे यांच्या ऐवजी गोपिनाथ मुंडे यांचे निष्ठावान अशी ओळख असणारे खासदार भगवान कराड यांना मंत्री करण्यात आले. त्यामुळे दोनही बहिणी नाराज असल्याची चर्चा होती. त्यावर आज प्रतिक्रिया देताना आपण नाराज नसल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. मात्र, गोपिनाथ मुंडे यांच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.

Updated : 9 July 2021 9:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top