Home > Politics > #projectpegasus : Pegasus पाळत प्रकरणाचे लोकसभेत तीव्र पडसाद

#projectpegasus : Pegasus पाळत प्रकरणाचे लोकसभेत तीव्र पडसाद

#projectpegasus : Pegasus पाळत प्रकरणाचे लोकसभेत तीव्र पडसाद
X

देशातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विरोधी पक्षाचे नेते आणि मानवी हक्क कार्यकर्ते अशा लोकांवर पिगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून पाळत ठेवल्याच्या वृत्ताने देशभर खळबळ उडाली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या मुद्दयावरुन लोकसभेत मोठा गदारोळ झाला. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने लोकसभेचे कामकाज मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पाळत ठेवली गेल्याच्या सर्व आऱोपांचा इन्कार केला आहे. प्रसिद्ध केल्या गेलेल्या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नाही, असा दावा त्यांनी लोकसभेत केला. "एका वेब पोर्टलने काल रात्री खळबळजनक असे वृत्त प्रसिद्ध केले. यात अनेक गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. पण हे वृत्त संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी प्रसिद्ध झाले हा काही योगायोग नाही" असे वैष्णव यांनी म्हटले आहे. पेगॅससचा असाच वापर वॉट्सबाबतही केला गेल्याचे आरोप याआधी झाले आहेत. पण त्या आरोपांमध्येही कोणते तथ्य नसल्याचे सिद्ध झाले आहे आणि संबंधित सर्वांनी ते नाकारले देखील आहेत, असेही वैष्णव यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर 18 जुलै रोजी प्रसिद्ध झालेले वृत्त भारतीय लोकशाही आणि यामधील व्यवस्थेची प्रतीमा मलिन करणारे आहे, असा आरोपही मंत्र्यांनी केला आहे.

गदारोळामुळे थांबलेले लोकसभेचे कामकाज दुपारी साडे तीन वाजता पुन्हा सुरू करण्यात आले. पण विरोधकांनी We want justice अशा घोषणा दिल्या. त्यानंतर अध्यक्षांनी कामकाज उद्यापर्यंत स्थगित केले.

Updated : 19 July 2021 12:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top