Home > Politics > #OppnMeet - सोनिया गांधींना ममता दीदींचा थेट सवाल !

#OppnMeet - सोनिया गांधींना ममता दीदींचा थेट सवाल !

#OppnMeet - सोनिया गांधींना ममता दीदींचा थेट सवाल !
X

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी १९ विरोधी पक्षांची बैठक शुक्रवारी बोलावली होती. या बैठकीत मोदींविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त करण्यात आली. पण आता या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना एक थेट सवाल केल्याची चर्चा आहे. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. आप, टीआरएस, बीजेडी आणि वायएसआर यासारख्या पक्षांना या बैठकीला का बोलावण्यात आले नाही, असा थेट सवाल ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे.

शुक्रवारी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली 19 विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, फारूक अब्दुल्ला, एमके. स्टॅलिन, ममता बॅनर्जी यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होता. या बैठकीसंदर्भात स्वत: शरद पवार यांनी ट्वीट करून माहिती दिली. "सोनिया गांधी यांच्या प्रयत्नाने आज समान विचारधारा असणाऱ्या विरोधी पक्षाची एक बैठक पार पडली. ऑनलाईन पार पडलेल्या बैठकीत सहभागी होऊन आपले विचार व्यक्त केले.मी वास्तविकपणे देशातील सद्यस्थिती पाहता या अतिमहत्त्वाच्या बैठकीच्या आयोजनासाठी उचललेल्या पाऊलांचं कौतुक करतो. भारताची सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. शेतकरी अनेक महिन्यांपासून विरोध करत आहे. भारतासारख्या लोकशाही प्रधान देशासाठी वाईट चित्र आहे. आर्थिक मंदी, कोविड महामारी, बेरोजगारी, सीमावाद, अल्पसंख्याक समुदायांतील लोकांचे प्रश्न आज देशासमोर आहेत. सध्याचं सरकार हे सर्व प्रश्न सोडण्यात अपयशी ठरलं आहे. जे लोक लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवतात. जे लोक आपल्या देशातील लोकशाहीच्या सिद्धांतांना वाचवण्यासाठी काम करु इच्छितात. त्यांना एकत्र येण्याचं मी आवाहन करतो आहे."

असे शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Updated : 20 Aug 2021 3:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top