Home > Politics > राज्यात ऑपरेशन लोटस सुरू आहे का? सुधीर मुनगंटीवार म्हणतात

राज्यात ऑपरेशन लोटस सुरू आहे का? सुधीर मुनगंटीवार म्हणतात

राज्यात ऑपरेशन लोटस सुरू आहे का? सुधीर मुनगंटीवार म्हणतात
X

महाविकास आघाडी सरकार संदर्भातील घडामोडींवर भाजप लक्ष ठेवून असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. राज्यातील सरकार अस्थिर होऊन विकासाचे प्रश्न मागे पडत असतील तर त्यासंदर्भात काय करता येईल याबाबत विचारमंथन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. "भाजप - शिवसेना या पक्षांनाच जनतेने भरघोस मते देत सरकार चालवण्याची संधी दिली होती. याची आठवण करून देत शिवसेनेच्या मनात मात्र कपट आल्याने त्यांनी आयुष्यभर विरोध केलेल्या काँग्रेसशी घरोबा केला" अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. राज्यात कुठल्याही पद्धतीने ऑपरेशन लोटस अथवा मिशन लोटस सुरू नसल्याचे मत मांडत या सरकारने केवळ स्वतःचे कल्याण केल्याची टीका त्यांनी केली. हे बंड आधीच व्हायला हवे होते असे सांगत 'देर आये दुरुस्त आये' असेही त्यांनी म्हटले होते.

Updated : 21 Jun 2022 12:37 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top