Home > Politics > राजस्थानमध्ये काँग्रेस पुन्हा अडचणीत, सचिन पायलट यांच्या मार्गात अडथळा कुणाचा?

राजस्थानमध्ये काँग्रेस पुन्हा अडचणीत, सचिन पायलट यांच्या मार्गात अडथळा कुणाचा?

राजस्थानमध्ये काँग्रेस पुन्हा अडचणीत, सचिन पायलट यांच्या मार्गात अडथळा कुणाचा?
X

देशामध्ये सध्या काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणुका घेतल्या जाणार आहेत. राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या गळ्यात अध्यक्ष पदाची माळ पडण्याची दाट शक्यता. आहे. एकीकडे ते अध्यक्ष पदाची निवडणुक लढवत सताना राजस्थानच्या मुख्यमंत्री पदी सचिन पायलट यांची वर्णी लागणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या.

पण आत त्यात एक मोठा ट्विस्ट आला आहे. राजस्थान काँग्रेसमधील गेहलोत गटाचे ९२ आमदार हे सचिन पायलट यांच्या नावाला विरोध करत आहेत. एकतर अशोक गेहलोत यांनाच मुख्यमंत्री पदी कायम असुद्या अथवा गेहलोत गटापैकी कुणा एकाला मुख्यमंत्री करा अशी मागणी या नराज आमदारांची असल्याचं समोर येतंय. अन्यथा राजीनामा देण्याचा इशारा य़ा आमदारांनी दिला आहे. आता आधीच राजस्थानमध्ये काँग्रेसचे आमदार १०७ आणि त्यातही ९२ आमदारांनी राजीनामा देण्याच्या गोष्टी करणं ही गंभीर बाब आहे. त्यामुळे सचिन पायलट यांच्या हाता तोंडाशी आलेला घास असा हिसकावला तर जाणार नाही ना अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. तर दुसरी कडे अशोक गेहलोत यांचीच ही खेळी असल्याचं देखील म्हटलं जातंय.

या सगळ्या आमदारांना समजावण्यासाठी पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांना राजस्थान मध्ये पाठवलं आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत अजय माकन हे देखील या आमदारांशी चर्चा करणार आहेत. परंतू अशोक गेहलोत यांनी हे आमदार ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत असं सांगितलं आहे. काँग्रेसच्या पडत्या काळात नव्या अध्यक्षांची नेमणूक पक्षात एक नवा उत्साह आणेल हे नक्की पण त्या आधी पक्षात सातत्याने अशा अडचणी येणं काँग्रेसला भविष्यात कुठे घेऊन जाईल हे येणारा काळच ठरवेल.

Updated : 26 Sep 2022 3:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top