Home > Politics > तुम्ही गद्दार आहात म्हणत वृध्दाने बच्चू कडू यांना विचारला जाब, बच्चू कडू यांनी काढला पळ

तुम्ही गद्दार आहात म्हणत वृध्दाने बच्चू कडू यांना विचारला जाब, बच्चू कडू यांनी काढला पळ

तुम्ही गद्दार आहात, असं म्हणत बच्चू कडू यांच्या गाड्यांचा ताफा अडवत वृध्दाने बच्चू कडूंना झापल्याचे समोर आले आहे.

तुम्ही गद्दार आहात म्हणत वृध्दाने बच्चू कडू यांना विचारला जाब, बच्चू कडू यांनी काढला पळ
X

राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेतील 40 आणि अपक्ष 10 आमदारांनी बंडखोरी केल्याने उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे सरकार पडले. त्यानंतर या आमदारांवर गद्दार असल्याची टीका करण्यात येत आहे. त्यातच बच्चू कडू धाराशिव (Dharashiv) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना एका वृध्दाने बच्चू कडू (Bacchu kadu) यांना चांगलेच झापल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तुम्ही असं का वागत आहात? जरा नीट वागा ना ! राज्यघटनेच्या चौकटीत वागा, जनतेला त्रास देऊ नका, असं म्हणत वृध्दाने थेट बच्चू कडू यांना जाब विचारला. यावेळी बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी त्या वृध्दाला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ही गद्दारी (Gaddari) नाही तर गद्दारीचा बाप आहे का? यांचं वागणं नीट आहे का? असा थेट सवाल बच्चू कडू यांना विचारला. यानंतर बच्चू कडू यांनी त्या ठिकाणाहून पळ काढल्याचे पहायला मिळाले. मात्र त्यानंतर त्या व्यक्तीने बच्चू कडू यांची गाडी अडवून यांचं वागणं बरं नाही. यांनी जनतेसोबत गद्दारी केली. बच्चू कडू डाकूबरोबर गेले. बच्चू कडू यांना ज्यामुळे निवडून दिले. तसं ते वागले नाहीत. हे जे सुरु आहे, ते योग्य नाही. घटनाबाह्य (Unconstitutional) असल्याचेही वृध्द व्यक्ती म्हणाली.

बच्चू कडू यांना थेटपणे जाब विचारल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Bacchu kadu Viral Video) होत आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्या प्रतिमा मलिन होण्याची शक्यता आहे.

Updated : 1 March 2023 2:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top