Home > Politics > कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजाला प्रतिनिधीत्व मिळायला हवे: अजित पवार

कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजाला प्रतिनिधीत्व मिळायला हवे: अजित पवार

कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजाला प्रतिनिधीत्व मिळायला हवे:  अजित पवार
X

सुप्रीम कोर्टाने मध्यप्रदेशमध्ये ओबीसी आरक्षण लागू केले आहे. त्यामुळे राज्यातही आम्ही लगेच प्रयत्न सुरू केले आहेत. बांठिया समिती नेमलेली आहे त्यांचेही काम सुरू आहे. मध्यप्रदेश राज्य जसं सुप्रीम कोर्टात गेले त्याचधर्तीवर जूनमध्ये बांठीया समितीचा अहवाल आल्यावर आमचं म्हणणं मांडणार आहोत. ओबीसींना प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे यासाठी राज्यसरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनता दरबारात आले असता पत्रकारांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला.इंपिरिकल डाटा गोळा करण्यासाठी बांठिया समिती नेमलेली आहे. मध्यप्रदेशने काय दाखल केले तेही पाहिले आहे. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजाला प्रतिनिधीत्व मिळायला हवे यासाठी प्रयत्न सुरुच राहणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणाबाबत दोन्ही सभागृहात विधेयक पास झाले होते. विरोधकांनीही पाठिंबा दिला होता. त्याप्रमाणे कारवाया झाल्या राज्यपालांनीही विधेयकावर तात्काळ सही केली. त्यामुळे मध्यप्रदेशप्रमाणे न्यायव्यवस्थेसमोर आमची बाजू प्रभावीपणे मांडू. त्यासाठी तज्ज्ञ वकीलांची टीम देण्यात आली आहे. आता सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च आहे. न्यायव्यवस्थेला तो अधिकार आहे असेही अजित पवार म्हणाले.

राज्यसभा सहा जागा आहेत. त्यामध्ये दोन जागा भाजप येतात. एक जागा शिवसेनेची येते. तर राष्ट्रवादीची एक जागा येईल आणि कॉंग्रेसची एक जागा येईल.मतं शिल्लक राहतात त्यामध्ये सर्वाधिक मते शिवसेनेची राहणार आहेत. सहसा स्वतंत्र पक्ष असतात ते रुलिंग पार्टीचे ऐकतात. त्यामुळे बघुया काय होतेय ते. कुणी किती जागा लढवायच्या तो त्यांचा प्रश्न आहे. सूचक ज्यांना जास्त त्यांना जागा मिळतील. संभाजीराजेबद्दल मला काहीच माहिती नाही. पवारसाहेबांसोबत चर्चा झाली असेल तर त्यांना विचारण्याचा आम्हाला अधिकार नाही असेही अजित पवार म्हणाले. प्रभाग रचना निवडणूक आयोगाच्या अधिकारात झाली आहे. त्यांनी याबाबत हरकती मागविल्या होत्या. त्यानंतर प्रसिद्ध झाले आहे. नाना पटोले यांच्या आरोपात तथ्य आहे की नाही त्याबद्दल मला बोलायचे नाही असेही अजित पवार म्हणाले.

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची नावे आलेली आहेत. विचार करत असल्याचे राज्यपाल सांगत आहेत.. कधी कधी एखाद्या कार्यक्रमात भेटले तर करेंगे... करेंगे... अजितजी... क्यूं फिकर करते हो... असे त्यावेळी बोलतात असेही अजित पवार म्हणाले. आगामी निवडणुका घेण्याबाबत सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत त्यामध्ये कुणाला ढवळाढवळ करता येत नाही. त्याबद्दल निवडणूक आयोग निर्णय घेईल असेही अजित पवार म्हणाले.

शिर्डी दौर्‍यावर असताना ताराचंद म्हस्के यांना विनंती केली होती. त्यानुसार त्यांनी आज पक्षात प्रवेश केला त्यांचे पक्षात स्वागत अजित पवार यांनी केले. यावेळी सगळे मिळून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवू असेही अजित पवार यांनी सांगितले. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे यांच्यावतीने कारागृहातील कैद्यांसाठी राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धा आयोजित केली आहे. याचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. लक्ष्मीकांत खाबिया यांनी हा स्तुत्य उपक्रम सुरू केला त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले.

Updated : 19 May 2022 7:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top