Home > Politics > Bharat jodo yatra : 'मिडिया' नाही 'मिडिया मालक' विकले गेले: जयराम रमेश

Bharat jodo yatra : 'मिडिया' नाही 'मिडिया मालक' विकले गेले: जयराम रमेश

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. या यात्रेवर भाजपकडून वारंवार टीका केली जाते. तर दुसरीकडे मीडियाही भारत जोडो यात्रेला कव्हरेज देत नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे मीडिया विकली गेली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नाला जयराम रमेश यांनी उत्तर दिले आहे.

Bharat jodo yatra : मिडिया नाही मिडिया मालक विकले गेले: जयराम रमेश
X

कधी कंटेनरवर ( container) टीका केली तर कधी राहुल गांधीच्या टी-शर्टवर..( T-shirt) काँग्रेस ( congress) शानदार भारत जोडो यात्रा काढू शकतो, असा विचारही भाजपने ( BJP)कधी केला नव्हता, असं मत जयराम रमेश यांनी व्यक्त केले. तसेच भारत जोडो यात्रा बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू राहतील परंतु आम्ही थांबणार नाही,असा विश्वास जयराम रमेश यांनी व्यक्त केला

पुढे बोलताना जयराम रमेश म्हणाले,जानेवारीमध्ये जम्मू कश्मीर सर केल्यानंतरच राहुल गांधी (rahul gandhi)थांबतील. पण या यात्रेला मीडिया कव्हरेज देत नाही, असा प्रश्न विचारताच जयराम रमेश म्हणाले, मीडिया विकली गेली नाही तर मालक विकले गेले आहेत. त्यामुळे भारत जोडो यात्रेला कव्हरेज मिळत नाही. मॅक्स महाराष्ट्रचे स्पेशल सिनियर करस्पाँडंट विजय गायकवाड यांनी जयराम रमेश यांच्याशी साधलेल्या संवादावेळी या प्रश्नांची उत्तरं दिली.

Updated : 11 Nov 2022 4:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top