Home > Politics > खंडणीच्या आरोपांप्रकरणी देशमुखांविरोधात अजून कोणतेही पुरावे नाहीत: परमबीर सिंग

खंडणीच्या आरोपांप्रकरणी देशमुखांविरोधात अजून कोणतेही पुरावे नाहीत: परमबीर सिंग

खंडणीच्या आरोपांप्रकरणी देशमुखांविरोधात अजून कोणतेही पुरावे नाहीत: परमबीर सिंग
X

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चौकशी आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले असून, त्यांच्याकडे या प्रकरणात सादर करण्यासाठी आणखी कोणतेही पुरावे नसल्याचा प्रतिज्ञापत्रात म्हंटले आहे.

देशमुख यांच्यावर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने या वर्षी मार्चमध्ये निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय आयोगाची स्थापना केला होती. आयोगाने सिंग यांना अनेक समन्स बजावले पण ते अद्याप हजर झाले नाहीत. विशेष म्हणजे, आयोगाने त्याच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंटही जारी केले होते.
रिपब्लिक भारत हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, परमबीर सिंग हजर न राहिल्याबद्दल आयोगाने सिंग यांना तीनदा दंड ठोठावला आहे, ज्यात जूनमध्ये रु. 5,000 आणि इतर दोनवेळ प्रत्येकी 25,000 रुपयांचा दंड ठोठावला गेला. तर चौकशी आयोगासमोर विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी, "परमबीर सिंग यांनी सुरुवातीला मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राव्यतिरिक्त या प्रकरणात कोणताही पुरावा देण्यास नकार दिला असल्याचं म्हंटलं आहे. तर परमबीर सिंग उलट तपासणीसाठीही तयार नाही," असेही शिशिर हिरे यांनी सांगितले आहे.

Updated : 2021-11-03T19:17:40+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top