Home > Politics > देवेंद्र फडणवीस यांना धक्का, जलयुक्त शिवार योजनेत सरकारची क्लिनचीट नाहीच

देवेंद्र फडणवीस यांना धक्का, जलयुक्त शिवार योजनेत सरकारची क्लिनचीट नाहीच

देवेंद्र फडणवीस यांना धक्का, जलयुक्त  शिवार योजनेत सरकारची क्लिनचीट नाहीच
X

राज्य़ाचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का बसला आहे. फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील कामांमध्ये अनियमितता असल्याच्या कॅगच्या ठपक्यानंतर राज्य सरकारने सुरू केलेल्या चौकशीमध्ये क्लीनचिट मिळाल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत समाधान व्यक्त केले होते. पण आता राज्य सरकारने या प्रकरणात क्लीनचिट दिली नसल्याचे आता उघड झाले आहे.

जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणीत अनियमितता असल्याचे ताशेरे कॅगने ओढले होते. त्यासंदर्भात राज्य सरकारने चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली होती. या समितीने क्लीन चिट दिल्याचे वृत्त सर्वत्र पसरले होते. पण या समितीची चौकशीच अजून पूर्ण झालेली नाही, त्यामुळे क्लिनचीट देण्याचा प्रश्नच नाही, असा खुलासा राज्य सरकारने केला आहे.

मंगळवारी मृद व जलसंधारण विभागाच्या अपर मुख्य सचिवांची लोकलेखा समितीसमोर साक्ष होती. त्यावेळी सचिवांनी सादर केलेल्या माहितीच्या आधारे सदर वृत्त देण्यात आले आहे. पण CAG ने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सचिवांनी आपली साक्ष नोंदविलेली आहे व ही आकडेवारी योजनेची अंमलबजाणी करणा-या यंत्रणेने स्वतः दिलेली आहे. या समितीचे अध्यक्ष भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार आहेत, असेही राज्य सरकारने केलेल्या खुलाशात नमूद केले आहे.

या अभियानाच्या सविस्तर चौकशीसाठी राज्य सरकारने SIT ची स्थापना केली होती. योजनेच्या ७१% कामांमध्ये आर्थिक आणि प्रशासकीय अनियमितता असल्याचे स्पष्ट झालेले आहे. SIT च्या अहवालाप्रमाणे सरकारने सर्व जिल्हाधिका-यांना चौकशी करण्याचे आदेश याआधीच दिलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी SIT च्या निकषाप्रमाणे चौकशी अहवाल सादर केलेले नाही. ही चौकशी सुरू असतांना जलयुक्त शिवार अभियानाला क्लिनचिट देण्याचा प्रश्नच येत नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. दरम्यान ठाकरे सरकारने जलयुक्त शिवार योजनेत क्लिनचीट दिल्याचे वृत्त प्रसारीत होताच देवेंद्र फडणवीस यांची योजनाच चांगली होती असा दावा भाजप नेत्यांनी केला होता.

Updated : 27 Oct 2021 11:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top