Home > Politics > 'सामनाची भाषा मिठापासून ते गोड कशी करायची याची रेसिपी आम्हाला माहित आहे'- नितेश राणे

'सामनाची भाषा मिठापासून ते गोड कशी करायची याची रेसिपी आम्हाला माहित आहे'- नितेश राणे

'सामना ची भाषा मिठापासून ते गोड कशी करायची याची रेसिपी आम्हाला माहित आहे' असं म्हणत नितेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. ट्विट करता नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

सामनाची भाषा मिठापासून ते गोड कशी करायची याची रेसिपी आम्हाला माहित आहे- नितेश राणे
X

सिंधुदुर्ग : 'सामना ₹ची भाषा मिठापासून ते गोड कशी करायची याची रेसिपी आम्हाला माहित आहे' असं म्हणत नितेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. ट्विट करता नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेवरून शिवसेना आणि राणे कुटुंबीय यांच्यात एकमेकांवर टीका करणं सुरूच आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' मधून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याच्यासह राणे कुटुंबियांवर खरमरीत भाषेत टीका केली जात आहे. सामनाच्या याच भाषेवरून नितेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, 'सामना ची भाषा मिठापासून ते गोड कशी करायची याची रेसिपी आम्हाला माहित आहे',






सोबतच निलेश राणे यांनी म्हटले आहे की काही "आडनाव" ऐकली की, शिवसेना लगेच गोड होते.आमच्या देवेंद्रजींची 10 मिनिटं मुख्यमंत्री वेगळी भेट घेतात. युतीची आठवण येते. सगळ एकदम गोड गोड.म्हणून नेहमी सांगतो.. चड्डीत राहायचं!, असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी 'जर प्रहार मधून आम्ही लिहिलं तर शिवसेना महागात पडेल' असं म्हटलं होतं. दरम्यान 'सामना'च्या भाषेवरून त्यांनी ट्विटरवरून निशाणा साधत नवा वाद निर्माण केला आहे. यावर आता शिवसेना काय प्रत्युत्तर देते हे पाहावं लागेल.

Updated : 2 Sep 2021 9:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top