Home > Politics > विरोधी विचारांचा सरपंच निवडून आला तर मी एक रुपया देणार नाही, नितेश राणे यांची धमकी

विरोधी विचारांचा सरपंच निवडून आला तर मी एक रुपया देणार नाही, नितेश राणे यांची धमकी

विरोधी विचारांचा सरपंच निवडून आला तर मी एक रुपया देणार नाही, नितेश राणे यांची धमकी
X

राज्यात ग्रामपंचायत निवडणूकीचा धुराळा उडाला आहे. प्रत्येक ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात रहावी, म्हणून अनेक आमदार प्रचारात उतरले आहेत. त्यातच कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी ग्रामपंचायत निवडणूकीत नांदगाव ग्रामस्थांना थेट धमकी दिली आहे.

नितेश राणे म्हणाले, मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. माझ्या पोटात एक आणि ओठात एक नसतं. त्यामुळे मी अगदी स्पष्टपणे सांगतो की, माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर मी गावच्या विकासासाठी एक रुपयाचा निधीही देत नसतो, अशी थेट धमकी नितेश राणे यांनी नांदगाव ग्रामस्थांना दिली.

Updated : 13 Dec 2022 10:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top