Home > Politics > त्या चुXX उद्धव ठाकरे ला संज्या डुबवणार, निलेश राणे यांचे आक्षेपार्ह वक्तव्य

त्या चुXX उद्धव ठाकरे ला संज्या डुबवणार, निलेश राणे यांचे आक्षेपार्ह वक्तव्य

राज्यात राजकीय संघर्ष टोकाला गेला आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांपासून सुरु झालेल्या टीका वैयक्तिक पातळीपर्यंत गेल्या आहेत. त्यातच संजय राऊत यांनी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नारायण राणे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यानंतर आता भाजप नेते निलेश राणे यांनी थेट उध्दव ठाकरे यांना शिवीगाळ केली आहे.

त्या चुXX उद्धव ठाकरे ला संज्या डुबवणार, निलेश राणे यांचे आक्षेपार्ह वक्तव्य
X

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या दावोस दौऱ्यासंदर्भात प्रश्न विचारला असता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यामध्ये संजय राऊत म्हणाले की, अरे सोड रे तो XX माणूस आहे. त्यानंतर नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावरही संजय राऊत यांनी टीका केली. त्यावरून भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

निलेश राणे यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, त्या चुXX उद्धव ठाकरे ला संज्या डुबवणार

त्यानंतर निलेश राणे यांनी आणखी एक ट्वीट करून संजय राऊत यांना धमकी दिली आहे. त्यामध्ये निलेश राणे म्हणाले, भिकारXट संज्या राऊत तू जिथे दिसशील तिथेच फटके घालणार. तुला आता सोडणार नाही.

निलेश राणे आणि संजय राऊत यांच्यातील वादामुळे राज्यातील राजकारणाची पातळी घसरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी संसदीय भाषेचा वापर न करता अशा प्रकारचे वक्तव्य केल्याने महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळीमा फासला जात आहे. त्यामुळे सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना समज द्यायला हवी, असं मत सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत.

Updated : 17 Jan 2023 2:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top