Home > Politics > पुढील पंचवीस वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहणार : संजय राऊत

पुढील पंचवीस वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहणार : संजय राऊत

पुढील पंचवीस वर्षे  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहणार :  संजय राऊत
X

सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, सुप्रिया ताई सुळे यांचा देखील हेच म्हणणे आहे की हेच मुख्यमंत्री पुढील पंचवीस वर्षे राहणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात काही लोक संभ्रम निर्माण करत असतात सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे.महा विकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतात असं शिवसेना प्रवक्त संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राज्यसभेसाठी सहापैकी ज्यांनी सातवी जागा भरलेले आहे. त्यांना या राज्यांमध्ये घोडेबाजार करायचा आहे असं दिसत आहे. खरं तर त्यांच्या कडे एवढी मतं नाही आहेत जर मत असती तर त्यांनी नक्कीच संभाजी राजे छत्रपती यांना उमेदवार केलं असतं. त्यांनी आधी छत्रपती संभाजी राजांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला त्यांना सहाव्या जागेसाठी उतरण्याचा प्रयत्न केला. मग नंतर त्यांना वार्‍यावर सोडलं आणि कोल्हापुरातून आज आहे का दूध आणि साखर व्यवसायातील एकाला उमेदवारी दिली. भाजपाचा आश्चर्य वाटतं भाजपाचे दोन्ही उमेदवार महाराष्ट्राचे नसून ते बाहेरचे आहेत. य भारतीय जनता पार्टीची निष्ठावान आहेत जय संघ परिवाराशी संबंधित आहेत ज्यांनी वर्षानुवर्षे काम केले आहेत त्यांना डावलण्यात आल्याचा मी वाचले.

इतर पक्षातून आले आहेत आणि ते फक्त शिवसेना व महा विकास आघाडी वर चिखलफेक करत असतात अशा लोकांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षातच फार नाराज आहे असं माझ्या वाचनात आणि पाहण्यात येत आहे. भारतीय पक्ष आता जुना राहिलेला नाही अशाच बाहेरचा लोकांनी येऊन हा पक्ष ताब्यात घेतला आहे. आम्ही शिवसेनेचे आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी दिलेली आहे. ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा न्यायालयात आहे आणि त्यावर मी आता भाष्य करणार नाही. आठ जून ला होणारी संभाजीनगर येथील सभा रेकॉर्डब्रेक होणार आहे, या सभेतून मराठवाड्यातील वातावरण संपूर्णपणे ढवळून निघेल असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.





Updated : 31 May 2022 8:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top