Home > Politics > छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून नीलम गोऱ्हे राज्यपालांवर भडकल्या

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून नीलम गोऱ्हे राज्यपालांवर भडकल्या

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून नीलम गोऱ्हे राज्यपालांवर भडकल्या
X

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभानिमीत्त आयोजित कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून नीलम गोऱ्हे यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली.

यावेळी बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, राज्यपाल पदावर असलेल्या व्यक्तीवर टीका करू नये असा प्रघात आहे. मात्र राज्यपाल पदावरील व्यक्तीच जर महापुरूषांची बदनामी करत असेल आणि आमच्या अस्मितांवर बोलत असेल तर त्यांना उत्तर द्यायलाच हवे.

Updated : 20 Nov 2022 2:03 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top