Home > Politics > १२ आमदारांच्या यादीतून राजू शेट्टींना वगळले? राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

१२ आमदारांच्या यादीतून राजू शेट्टींना वगळले? राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

१२ आमदारांच्या यादीतून राजू शेट्टींना वगळले? राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया
X

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसने वगळले आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये राजू शेट्टी यांनी सरकारविरोधात मोर्चे काढले होते, तसेच सत्ताधाऱ्यांवर टीकासुद्धा केली होती. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसेने १२ आमदारांच्या यादीमधून वगळले अशी चर्चा सुरू झाली, त्यानंतर राजू शेट्टी यांनी प्रत्येकाची वेळ येत असते, आपणही योग्यवेळी उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया दिली होती. पण या सर्व गदारोळात राष्ट्रवादी काँग्रेसने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिल्यांदाच पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

राज्यपालांकडे देण्यात आलेल्या १२ सदस्यांच्या यादीमधून कुणाचेही नाव वगळण्यात आलेले नाही, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. चाळीसगावमधील पूरग्रस्त भागाची पाहणी जयंत पाटील यांनी केली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विधान परिषदेवरील १२ आमदारांच्या यादीमधून कुणाचेही नाव वगळण्यात आलेले नाही. राज्य सरकारने राज्यपालांना पुन्हा यासंदर्भात निर्णय घेण्याची विनंती केल्याचे त्यांनी सांगितले. १२ आमदारांच्या नावांचा प्रस्ताव तिन्ही पक्षांच्या मंजुरीनंतर राज्यपालांना पाठवण्यात आला. पण त्यांनी यावर अनेक महिन्यांनंतरही निर्णय घेतला नसल्याने लोकशाहीचे संकेत पाळले जात नसल्याचे राज्यातील जनतेला आता वाटू लागले आहे, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली आहे.१२ आमदारांच्या यादीतून राजू शेट्टींना वगळले? राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

Updated : 4 Sep 2021 8:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top