Home > Politics > प्राप्तीकर विभागाच्या धाडींविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

प्राप्तीकर विभागाच्या धाडींविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

प्राप्तीकर विभागाच्या धाडींविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
X

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर तसेच पार्थ पवार यांच्या कार्यालयावर प्राप्तीकर विभागाने धाडी गुरूवारी टाकल्या. या धाडी सुडबुध्दीने केल्या गेल्या असल्याचा दावा करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कोरेगाव तालुक्यात काळ्या फिती बांधुन निषेध व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरावर केंद्राच्या प्राप्तीकर विभागाने केलेली छापेमारी भाजप सूडबुद्धीने करवून घेत आहेत. याच्या निषेधार्थ आज सातारा राष्ट्रवादीने कोरेगाव तालुक्यात निषेध मोर्चा काढला. यावेळी तोंडाला आणि हाताला काळ्या फिती बांधून कोरेगावच्या मुख्य चौकात रस्त्यावर ठिय्या आंदोलन राष्ट्रवादीतर्फे करण्यात आले. या आंदोलनात अजित पवार यांच्या समर्थानात घोषणाबाजी देखील करण्यात आली.

Updated : 9 Oct 2021 9:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top