Home > Politics > मैं भाग के जाने वाला नहीं हूँ – जयंत पाटील

मैं भाग के जाने वाला नहीं हूँ – जयंत पाटील

मैं भाग के जाने वाला नहीं हूँ – जयंत पाटील
X

माझ्याकडे काहीही नाही, मी दोन पुस्तकं घेऊन जातोय. मुक्कामासाठी म्हणून नाही, मात्र या आधी ज्यांना ज्यांना अनुभव आहे त्यांच्याकडून माहिती घेऊन जातोय. ED च्या पद्धतीप्रमाणे मध्ये मध्ये प्रश्न विचारतात त्यावेळेला उत्तर देईल अशी प्रतिक्रीया जयंत पाटील यांनी ED चौकशीला हजर राहण्याआधी पत्रकारांना सांगितलं.

ED च्या नोटीस मध्ये कशासाठी बोलवलंय हे नमूद नाही, त्यामुळे कशासाठी बोलवलंय हे माहित नाही, माझ्याकडे काही कागदपत्रे ही नाहीत. त्यामुळे ईडी चे अधिकारी जे जे विचारतील त्याची उत्तरे देईन, चौकशीला पूर्ण सहकार्य करेन असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. IL&FS गैरव्यवहाराप्रकरणी ही चौकशी करण्यात येत आहे असं सांगण्यात येत असलं तरी याबाबत आपल्याला काही माहित नाही. या कंपनीशी आपला कुठल्याही प्रकारचा संबंध आलेला नाही, तसंच माझ्या माहितीप्रमाणे या प्रकरणात चार्जशीटही दाखल करण्यात आलेली आहे असं जयंत पाटलांनी सांगितलं आहे. पत्रकारांशी बोलल्यानंतर जयंत पाटील चालतच ईडी च्या कार्यालयात पोहोचले. दुपारी १२ वाजता जयंत पाटील ईडी कार्यालयात हजर झाले. प्रदेश कार्यालय ते ईडी कार्यालयादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि सांगलीहून आलेल्या कार्यकर्त्यांच्या गराड्याच जयंत पाटील ईडी कार्यालयात पोहोचले.

Updated : 22 May 2023 6:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top