Home > Max Political > राष्ट्रवादीचे मंत्री विरुद्ध काँग्रेसचे आमदार! ट्विटरवर जुंपली

राष्ट्रवादीचे मंत्री विरुद्ध काँग्रेसचे आमदार! ट्विटरवर जुंपली

राष्ट्रवादीचे मंत्री विरुद्ध काँग्रेसचे आमदार! ट्विटरवर जुंपली
X

महाराष्ट्रातील ३०० आमदारांना सरकारमार्फत मुंबईत घरे देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतल्यापासून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी माविआमध्येही यावरून मतभेद आहेत. सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांमध्येच या मुद्द्यावरून जुंपल्याचे चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे युवा आमदार झिशान सिद्दीकी यांच्यात ट्विटर युद्ध रंगले आहे.

वांद्रे पूर्व येथील काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी ट्विट करत आपल्याच सरकारवर निशाणा साधला. "मला महाराष्ट्र सरकार मार्फत घराची गरज नाही. माझ्या मतदारसंघातील हजारो नागरिकांना घरे मिळत नाहीयेत आणि ते हालाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना विनंती करतो की आमदारांना घरे देण्यापेक्षा हा पैसा नागरिकांसाठी घरे बांधायला वापरावा"

या ट्विटला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड चांगलेच आक्रमक झालेले दिसले. ncp minister jitendra awhad vs mla zeeshan siddique twitter war

तर आव्हाडांच्या या उत्तरावर झिशान यांनीही पलटवार केला आहे. तुम्हाला अखेर ट्विटरवर मला उत्तर द्यायला वेळ मिळाला. गेले काही दिवस सभागृहात माझ्या वांद्रे पूर्व प्रभागातील SRA च्या प्रश्नावर उत्तर दिले नाहीत. राहता राहिला करोडो रुपयांच्या घरांचा प्रश्न तर तुमच्या मालकीची काय मालमत्ता आहे हे साऱ्या जगाला माहित्ये.

मंत्री आव्हाड देखील या प्रकरणावर संतापले असून त्याचा राग त्यांनी पत्रकारांवर काढला आहे. मग ते अशी फुकट घरे... फुकट घरे अशी बोंबाबोंब करत सुटतात. हरकत नाही.ज्याने कोणी ही बातमी पेरली आणि सर्वत्र पसरवली त्याचे मनापासून आभार. ते घर फुकटात नसून त्या घराची किंमत 1 कोटी रुपये असणार आहे. म्हाडा ने फुकटात घर कुणालाहि दिले नाही देणार नाही असं त्यांनी एका ट्विटमधे म्हटलं आहे.

Updated : 28 March 2022 5:24 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top