Home > Politics > तुमची लाचारी तुकडा टाकल्यावर शेपूट हलव'नाऱ्या' सारखी; विद्या चव्हाणांची राणेंवर जहरी टीका

तुमची लाचारी तुकडा टाकल्यावर शेपूट हलव'नाऱ्या' सारखी; विद्या चव्हाणांची राणेंवर जहरी टीका

तुमची लाचारी तुकडा टाकल्यावर शेपूट हलवनाऱ्या सारखी; विद्या चव्हाणांची राणेंवर जहरी टीका
X

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे ठाकरे सरकारवर टीका करण्याची कोणतेही संधी सोडत नाही. त्यातच त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबतच महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्या आणि माजी आमदार विद्या चव्हाण यांनी राणेंवर जहरी टीका केली आहे. 'तुमची लाचारी तुकडा टाकल्यावर शेपूट हलव'नाऱ्या' सारखी' असा खोचक टोला त्यांनी ट्वीट करत राणे यांना लगावला आहे.

विद्या चव्हाण यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, " तुमच्या, रक्तातील लाचारी, एक तुकडा टाकला की शेपूट हलव नाऱ्या- सारखी आहे. एक राज्यसभा,मंत्रिपदा साठी लाचारी करण व ज्यांनी मोठे बनवले (महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 3 महिने)त्याच्यावर भुंकणारे सारखीच आहे,असे म्हंटले तर "इमानदार प्राण्याचा "अपमान करण्यासारखे होईल, नाही का?",असे म्हंटले आहे.

तर, शेतकऱ्यांचे आंदोलन, पेट्रोल, डिझेल आणि गॅस चे भाववाढ या सर्व मुद्द्यावरून लोकांचे लक्ष वळविण्यासाठी बॉलिवूडला टारगेट करण्याचे काम केंद्र सरकार समीर वानखेडे यांच्या माध्यमातून करत आहेत, हे सगळे प्रकरण आता लोकांच्या लक्षात येऊ नये, आणि वानखडे यांना वाचवण्यासाठी हा सगळा प्रकार सुरू आहे. नवाब मलिक यांनी हा सर्व प्रकार उघडकीला आणल्यामुळे खरोखरच शेराला सव्वाशेर भेटल्यामुळे केंद्र सरकार दोन पावले मागे गेली आहे, अशीही टीका विद्या चव्हाण यांनी केली आहे.

Updated : 6 Nov 2021 10:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top