Home > Politics > भाजप हिंदूंना मूर्ख बनवत आहे, राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा

भाजप हिंदूंना मूर्ख बनवत आहे, राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा

भाजपकडून सातत्याने हिंदू खतरे में है अशा प्रकारे घोषणा दिल्या जातात. त्यामध्ये जनतेचे मूळ प्रश्न बाजूला सारले जात अस्लयाची टीका राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केली आहे.

भाजप हिंदूंना मूर्ख बनवत आहे, राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा
X

देशात महागाई (Inflation), बेरोजगारी (Unemployment) असे महत्वाचे मुद्दे आहेत. या मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी एकदा तरी बोलावं. मात्र महागाई, बेरोजगारी असे मुद्दे बाजूला सारून भाजप हिंदूंना मूर्ख बनवत असल्याची टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी केली. विद्या चव्हाण म्हणाल्या, महागाईवर कोणीच बोलत नाही. अधिवेशनातही या मुद्द्यावर कुणी बोलत नाही. कामाख्या देवीचं दर्शन घेऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री बनले. पण कामाख्या देवीचे दर्शन घेऊन इथल्या महाराष्ट्रातील देवीचा अपमान सरकारकडून सुरु आहे. एवढंच नाही तर पंतप्रधान मोदी वायफळ बोलत असतात. त्यांनी महागाई, बेरोजगारी या मुद्द्यावर बोलावं. त्यांनी वायफळ बोलू नये, असंही विद्या चव्हाण म्हणाल्या. त्या अमरावतीत महागाई व बेरोजगार विरोधातील जनजागरण यात्रेत बोलत होत्या.

Updated : 4 March 2023 4:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top