Home > Politics > २-४ महिने विलंब होईल पण बंडखोरांचं निलंबन निश्चित - जयंत पाटील

२-४ महिने विलंब होईल पण बंडखोरांचं निलंबन निश्चित - जयंत पाटील

२-४ महिने विलंब होईल पण बंडखोरांचं निलंबन निश्चित - जयंत पाटील
X

राज्याचे विसावे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर दोन दिवसीय विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. या आधिवेशनात विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकी व्यतिरिक्त जर कोणता मुद्दा गाजला असेल तर शिवसेनेच्या व्हीपचा! उद्धव ठाकरे यांच्या गटाचा व्हीप अधिकृत की एकनाथ शिंदे गटाने बजावलेला व्हीप अधिकृत यावरच चर्चा झाली. सुनील प्रभू यांच्या व्हीप विरोधात बंडखोर आमदारांनी राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मतदान केलं. यावर बोलताना जयंत पाटील यांनी, हे प्रकरण आता कोर्टात गेले आहे. अशी प्रतिक्रिया दिली. शिवाय २-४ महिने विलंब जरी झाला तरी बंडखोर आमदारांचे विलंबन होणार हे निश्चित आहे असं देखील जयंत पाटील म्हणाले.


Updated : 3 July 2022 12:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top