Home > Politics > भाजपची मतं मिळाल्याचा एकनाथ खडसे यांचा दावा

भाजपची मतं मिळाल्याचा एकनाथ खडसे यांचा दावा

भाजपची मतं मिळाल्याचा एकनाथ खडसे यांचा दावा
X

एकनाथ खडसे यांना पहिल्या पसंतीची २९ मतं मिळाली आहेत. राष्ट्रवादीने ठरवलेल्या कोट्यापेक्षा एकनाथ खडसे यांना जास्त मतं पडली आहेत. त्यामुळे ही अतिरिक्त मतं आपल्याला भाजपमधील आपल्या मित्रांनी दिला आहेत, असा दावा खडसे यांनी केला आहे.

"गेली ६ वर्ष आपला जो छळ झाला, आपल्यावर अनेक गंभीर आणि घाणेरडे आरोप करण्यात आले. मंत्रीपदाचा राजीनामा घेतला गेला. ईडीमार्फत आपल्या कुटुंबाला छळण्यात आले. अजूनही छळ सुरू आहे. अशा राजकीय विजनवासात जाण्याची परिस्थिती असताना, राष्ट्रवादीने आपल्याला साथ दिली आणि शरद पवार यांनी आपल्याला संधी दिली. त्यामुळे त्यांचा आभारी आहे" असे खडसे यांनी यावेळी सांगितले.

त्याचबरोबर सीडी काढण्याचा इशारा आपण दिला असला तरी योग्यवेळी ती काढली जाईल, असे खडसे यांनी सांगितले. पण आता विधान परिषदेत विविध विषयांवरुन आपण भाजपला घेरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आणखी एक उमेदवार रामराजे निंबाळकर यांचाही विजय झाला आहे.

Updated : 20 Jun 2022 4:49 PM GMT
Next Story
Share it
Top