Home > Politics > शरद पवारांच्या निर्णयाचे अनुकरण इतर नेते करणार का?

शरद पवारांच्या निर्णयाचे अनुकरण इतर नेते करणार का?

शरद पवारांच्या निर्णयाचे अनुकरण इतर नेते करणार का?
X

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या काही ठिकाणी वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांना गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर कार्यक्रमांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हजारो लोकांची गर्दी जमू शकते अशा कार्यक्रमांना न जाण्याचा निर्णय आपण घेतला आहे अशी माहिती स्वत: शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलतांना दिली. तसेच बंदीस्त हॉलमध्येही जिथे कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन केले जाणार असेल, अशाच कार्यक्रमांना आपण उपस्थित राहणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसात राजकीय कार्यक्रमांना झालेले गर्दी पाहता मुख्यमंत्र्यांनी सर्वच राजकीय पक्षांना अशी गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. पण आता आपल्या सर्वोच्च नेत्यांच्या आवाहनाचे आणि कृतीचे अनुकरण राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते करणार का, भाजपही तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन कार्यक्रमांना आवर घालणार का ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Updated : 7 Sep 2021 9:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top