Home > Politics > वर्षभरात समीर वानखेडें तुरुंगात जाणार: मंत्री नवाब मलिकांची भविष्यवाणी

वर्षभरात समीर वानखेडें तुरुंगात जाणार: मंत्री नवाब मलिकांची भविष्यवाणी

वर्षभरात समीर वानखेडें तुरुंगात जाणार:  मंत्री नवाब मलिकांची भविष्यवाणी
X

राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे (Sameer wankhede) यांचा एकेरी उल्लेख करत, ' एका वर्षात देशातील जनता तुला तुरुंगात टाकलेलें पाहील्याशिवाय राहणार नाही' असं वक्तव्य केलंय. आर्यन खान प्रकरणानंतर नवाब मलिक यांनी एनसीबीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आज पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना नवाब मलिक यांनी वानखेडेंवर आरोप करत एनसीबीच्या कारवाईबद्दल गंभीर आरोप केले आहेत,

एनसीबी करत असलेल्या कारवाईची प्रकरणं बोगस आहेत, त्यांना आपण लवकरच एक्सपोज करू असं सांगत नवाब मलिक यांनी वर्षभराच्या आत तुझी नोकरी जाईल असं गंभीर वक्तव्य मलिक यांनी केलंय. नवाब मलिकच्या जावयाला तुरुंगात टाकताना वरून दबाव टाकणारा तुझा बाप कोण? तुला एका तु वर्षात तुरुंगात जावं लागेल, असं वक्तव्य त्यांनी केलंय.

केंद्रीय यंत्रणांचा वापर करून हजारो कोटी रुपये वसूल करण्याचं काम केलं जातंय. हे अधिकारी आणि भाजपनेते लोकांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करताय, त्यांना लवकरच आपण एक्सपोज करू असंही ते पुढे म्हणाले. समीर वानखेडे हे बोगस आहेत, त्यांचे वडील बोगस होते, यांचे घरातले लोक बोगस आहेत असंही ते म्हणाले. मला वरुन दबाव आहे. मी काही केलं नाही असं मला हात जोडून सांगणारा वानखेडे 'तुझ्यावर दबाव टाकणारे तुझे बाप कोण हे सांग' अशा शब्दात त्यांनी वानखेडेंवर टीका केली आहे.

Updated : 21 Oct 2021 1:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top